… म्हणून महेश भट्ट ला आलिया मानत नाही वडिल; लहानपणी 500 रुपये देवून करुन घ्यायचे ‘हे’ काम

आलिया भट्ट हे बॉलिवूडच्या जगामधलं एक मोठं नाव आहे आणि आजच्या काळात लोकं तिला फक्त भारतातच नाही तर जगभरात ओळखतात. आलिया भट्टने तिच्या आयुष्यात खूप नाव, सन्मान आणि पैसा कमावला आहे आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप कमी वेळात उंचीचा शिखर गाठला आहे. यामुळे आलिया भट्टला सध्याच्या काळात कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही आणि प्रत्येकजण तिच्याबद्दल बोलताना दिसत आहे.

वडिलांचं मुलींशी असं नातं असतं, जिथे ते त्यांना नेहमी राजकन्येप्रमाणे वागवतात. त्याचबरोबर मुलीही वडिलांना सुपरहिरोपेक्षा कमी मानत नाहीत. दोघांमधला हा बंध लहानपणापासूनच इतका घट्ट असतो की, त्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवण्यापासून ते त्यांच्यासाठी काहीही करण्याची इच्छा बाळगण्यापर्यंत. अलीकडेच महेश भट्ट यांनीही आलियाशी संबंधित असाच एक किस्सा सांगितला आहे. जो तुम्हाला वडील-मुलीच्या नात्याबद्दल एक मोठा धडा देईल. 

आलियाला देतात 500 रुपये


आलिया आज ज्या ठिकाणी आहे तिथे पाहून तिचे वडील महेश भट्ट खूप आनंदी आहेत. एक दिवस आलिया अशी कामगिरी करेल याची त्यांना खात्री होती. आपल्या मुलीचं कौतुक करताना महेश भट्ट यांनी एका मुलाखतीदरम्यान असा एक किस्सा शेअर केला, ज्यामध्ये वडील आणि मुलीचे अतूट प्रेम दिसत आहे. ते म्हणाले, ‘आलिया लहान होती तेव्हा ती माझ्या पायावर 500 रुपयांची क्रीम लावून मसाज करायची. पण आज 50 वर्षांच्या आयुष्यातही तिने कष्टाच्या बळावर जेवढा पैसा कमावला आहे तेवढं मी करू शकलो नाही.

 महेश भट्ट यांना आपलं वडील न मानण्याबाबत बोलताना आलिया भट्टनं मोठं वक्तव्य करत म्हटलं होतं की, ती करण जोहरला तिचे वडील महेश भट्ट यांच्यापेक्षा वरचा दर्जा देते आणि त्यांना तिच्या वडिलांपेक्षा जास्त मानते. याच कारणामुळे आलिया भट्टबद्दल एवढी मोठी चर्चा होत आहे.