बॉलिवूड या नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय हिंदी चित्रपट हिला चित्रपट जगतात मानाचे स्थान आहे. बॉलिवूडने चित्रपट जगतात आपले स्थान टिकवण्याचे एकमेव कारण म्हणजे बॉलिवूड वर असणारी भारतीय संस्कृतीची असणारी छाप. त्यामुळेच आधी बॉलिवूड मध्ये बनणारे सगळेच चित्रपट अगदीच सामान्य चित्रपट असत व त्यात अश्ली-लता खुलेआम दाखवली जात नसे.
परंतु गेल्या काही वर्षापासून बॉलिवूड मध्ये हॉट चित्रपट बनवण्याचा ट्रेंड काहीसा वाढला आहे. याची सुरुवात मोठ्या प्रमाणात कोणी केली असेल तर दिग्दर्शक महेश भट्ट यांनी. भट्ट यांच्या चित्रपटात अतिशय बोल्ड आणि किसिंग सीन असतात. त्यामुळे या चित्रपटाला खूप मोठ्या प्रमाणात आंबटशौकीन चाहते देखील मिळाले. महेश भट्ट यांची मुलगीआलिया भट्ट आणि रणबीर कपूर आपल्या लग्नाच्या प्लॅनिंग मध्ये मग्न तर आहेत.
लवकरच दिघेही लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची शक्यता आहे. पण त्याचवेळी आलियाचं असे म्हणणं आहे की त्यांची मर्जी चालली तर तिचे वडील महेश भट्ट तिला कोणाशीही लग्न करू देणार नाहीत. होय, स्वत: आलियाने एका मुलाखतीत खुलासा केला होता की तिच्या वडिलांनी तिला लग्न करण्यास सक्त मनाई केली आहे आणि म्हणते की जर असे करण्याचा विचार केला तर ते तिला बाथरूममध्ये बंदिस्त करतील. त्यामुळे मला लग्न करताना हजार वेळा विचार करावा लागेल.
अखेर, यासमागील कारण काय आहे? आलियाने हेही उघड केले की तिचे वडील तिच्याबद्दल आणि तिच्या बहिणीबद्दल खूप सकारात्मक आहेत आणि आपली मुलगी आपल्याला सोडून कोठेही जाऊ नये असं त्यांचं मत आहे. आलिया म्हणाली की वडील नेहमी म्हणायचे की शाहीन आणि तू, तुम्ही दोघांनी लग्न करू नका अन्यथा मी तुम्हाला बाथरूम मध्ये डांबून ठेवेन. आलियाने पुढे सांगितले की ही विनोद नाही, खरोखर हे देखील ते करु शकतात.
आलियाने असेही सांगितले की, महेश भट्ट तिच्या ऑन-स्क्रीन किसिंग सीनबद्दल आणि रिअल लाइफमध्ये डेटिंगबद्दलही खूप सकारात्मक आहेत. तिच्या करियरच्या सुरुवातीच्या काळात आलियाने तिच्या वडिलांना आलियाच्या अर्जुन कपूरसोबत किसिंग सीनवर सांगितले होते की ती फक्त अभिनय करतोय. यावर पापा महेश भट्ट म्हणाले की, जर तू माझ्यासमोर एखाद्याला चुंबन दिले तर मी तुला बदडून काढेन.
पण हा आश्चर्यकारक खुलासा आहे कारण हाच तो महेश भट्ट आहे जो आपल्या मुली पूजा भट्टसोबत एका मासिकाच्या मुखपृष्ठावर लिप टू लिप किस करतांना दिसला होता आणि जेव्हा वाद चालू होता तेव्हा तिने सांगितले की पूजा माझी मुलगी नसती तर, मी तिच्याशी लग्न केले असते. अशा वादांमुळे त्याचे नाव इतके वाईट होते की ते स्वत: नैराश्यात गेले. त्याचबरोबर त्याने स्वत: च्याच चित्रपटांमध्ये ऑन-स्क्रीन किसिंग सीन दिले आहेत. तथापि, आलियाचा हा खुलासा देखील धक्कादायक आहे! आता आपण पाहूया रणबीरसोबत आलियाचे लग्न होईल का तिचे वडील तिला डांबून ठेवतील.