राखी पाठोपाठ आता ही ‘हॉट’ अभिनेत्री करतेय स्वयंवर.. हवाय असा नवरा ज्याचा असेल मोठा –

बॉलिवूड ही एक अशी इंडस्ट्री आहे ज्यात रोज काहीना काही घटना घडतच असतात. मीडिया आणि सोशल मीडियावर वर बॉलिवूड हे दिवसरात्र चर्चेचा विषय असते. यातील काही घटना या नकळत घडतात तर काही चर्चेत राहण्यासाठी मुद्दामून घडवून आणल्या असतात. मग त्या वैयक्तिक प्रमोशन साठी असो किंवा एखाद्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी.

प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याने लवकरात लवकर लग्न करून कौटुंबिक जीवनाची सुरुवात करावी. अनेक जण प्रेमाच्या बंधनात अडकतात आणि पुढे त्याच व्यक्ती सोबत विवाह करून संसार थाटतात. परंतु सर्वांच्याच नशिबी हे सुख असतेच असे नाही. बर्‍याच वेळा एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर लोक प्रेम करून बसतात आणि मग त्याच व्यक्तीसोबत लग्न करायच्या आग्रहामुळे ते अविवाहित राहण्याची देखील वेळ येऊ शकते.

आज आपण एका अश्या एका अभिनेत्री बद्दल जाणून घेणार आहोत जी अनेक कलाकारांसोबत प्रेम संबंधात राहिली परंतु अजून अविवाहित आहे. मग आता तिने विवाहासाठी चक्क स्वयंवराचा मार्ग स्वीकारला आहे. आणि हा स्वयंवर पूर्ण जगासमोर टेलिव्हिजनवर करण्याचा मानस तिने केला आहे.

छोट्या पडद्यावर स्वयंवर करणारी आणि मनासारखा वर शोधणारी राणी राखी सावंत पहिली अभिनेत्री ठरली होती. यानंतर, इतर कलाकार देखील या यादीमध्ये सामील झाले. यात आता बिग बॉस फेम अर्शी खानचं नाव जोडलं जाणार आहे. असं म्हटलं जात आहे की लवकरच अर्शी टीव्ही स्क्रीनवर स्वत:चा स्वयंवर करताना दिसणार आहे. यासाठी निर्मात्यांनी पूर्ण नियोजनही केले आहे.

टाइम्सच्या वृत्तानुसार टीव्ही चॅनेल या रिअॅलिटी शोसाठी असा चेहरा शोधत होते, ज्यामुळे त्यांना चांगली टीआरपी मिळू शकेल. अशा परिस्थितीत अर्शी खान हा एक चांगला पर्याय आहे. म्हणून त्यांनी अर्शीकडे संपर्क साधला आणि अभिनेत्रीनेही मान्य केलं आहे. शोमध्ये अर्शीला हवा तसा पार्टनर शोधण्यासाठी तिने आपली निवड निर्मात्यांना सांगितली आहे. याच्या आधारे स्पर्धकांची निवड केली जाईल.

राहुल महाजन यांनी स्वत:चे स्वयंवरही टीव्हीवर टेलिकास्ट केलं होतं. त्यानंतर त्यानं डिंपी गांगुलीशी लग्न केले. मात्र, काही वर्षानंतर दोघे वेगळे झाले आणि डिंपीने पुन्हा लग्न केले. आता ऐकले आहे की राहुल अर्शी खानच्या स्वयंवर होस्ट करणार आहेत. अशा शो चा त्याला अगोदरच एकदा अनुभव आहे. म्हणून, त्यामुळे तो हे काम व्यवस्थित रित्या करू शकतो असा आयोजकांचा अंदाज आह3.

इतर मुलींप्रमाणेच अर्शीलासुद्धा तिच्या जोडीदारामध्ये प्रत्येक प्रकाचे गुण अपेक्षित आहेत, जसं मुलगा काळजी घेणारा, प्रामाणिक आणि सत्यवान माणूस असावा. मुलाचा मोठा व्यवसाय असावा ही तिची महत्त्वाची अट आहे. याशिवाय ती मुलांच्या लूककडेही लक्ष देणार आहे. मात्र स्वयंवरात ती मुलाची निवड करण्यात काय विचार करणार, हे फक्त शो दरम्यान कळेल.

अर्शी खानला चर्चेत राहणं आवडते. तसेच, तिनं अनेकदा ऑन स्क्रिन अनेक देखण्या कलाकारांसोबत फ्लर्ट केलं आहे. बिग बॉस 14 मधील रुबीना दिलक यांचे पती अभिनव शुक्ला, अली गोनी आणि राहुल वैद्य यांच्याबरोबर तिनं बर्‍याच वेळा फ्लर्ट केलं आहे. मात्र ती अजून पर्यंत अविवाहितच राहिली.