वयाच्या 62व्या वर्षी देखील अजूनही तितकीच ग्लॅमरस दिसतेय सनी देओलची एक्स गर्लफ्रेंड.. अजूनही करतायत एकमेकांना डेट..

बॉलिवूडचा एकेकाळचा सुप्रसिद्ध अभिनेता आणि आजही ज्याच्या शरीरयष्टीचे लाखो दिवाने आहेत अशा सनी देओलने आपल्या चमकदार अभिनय आणि दमदार ऍक्शनमुळे हिंदी चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.सनी देओलने आपल्या करिअरची सुरूवात 1984 मध्ये ‘बेताब’ या चित्रपटाद्वारे केली होती. या सिनेमात त्याच्या विरुद्ध अभिनेत्री अमृता सिंग दिसली होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली.

‘बेताब’ मध्ये केलेल्या कामगिरीनंतर मात्र सनी ला मागे वळून बघावे लागले नाही. सनीने 90 च्या दशकात अनेक ब्लॉकबस्टर सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. या दशकात त्यांनी राज कुमार संतोषी दिग्दर्शित ‘घायल’ हा चित्रपट बनविला. याशिवाय सनी देओलने डर, घातक, जिद्दी, बॉर्डर सारख्या चित्रपटांसह अनेक हिट चित्रपट केले.

सनी देओल यांचे वैयक्तिक आयुष्यही त्याच्या फिल्मी करिअर इतकेच रंजक राहिले आहे.आज आम्ही तुम्हाला सनी देओलच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित एक प्रसंग सांगणार आहोत, ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल. सनी देओल नेहमीच अभिनय आणि आपल्या अफेअरमुळे बर्‍याच चर्चेत राहिला आहे. आज आम्ही आपल्याला त्याच्या एका एक्स गर्लफ्रेंडबद्दल सांगणार आहोत जी आज 62 वर्षांची असूनही ती सुंदरतेची बाबतीत एखाद्या 23 वर्षाच्या मॉडेललाही लाजवेल.

एक काळ असा होता की खास सनी देओलसाठी चित्रपट लिहिले जायचे. कारण जगभरात सनीचे चाहते होते. अजूनही आहेत. सनी देओलचे फायटिंग सीन्स प्रेक्षक आवडीने बघत असत. लाखो तरुण्या देखील सनीच्या ऍक्शन च्या चाहत्या होत्या, यामध्ये अनेक बॉलिवूड अभिनेत्रींचा देखील समावेश होता.

या सर्वांमध्ये एका विवाहित सुंदरीचेही सनी देओलवर मनापासून प्रेम होते आणि ती इतर कोणीही नसून ती प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया होती. डिंपल कपाडिया, सुपरस्टार राजेश खन्ना यांची पत्नी. या दोन स्वभावाप्रमाणे त्यांचे प्रेम देखील निखळ आणि छुपे होते, परंतु जास्त काळ ते लोकांपासून लपू शकले नाहीत.

1980 च्या काळात सनी देओल एक दमदार अभिनेता होता, तर डिंपल कपाडिया देखील आपल्या अदाकारीने लोकप्रिय झाली होती. सनी आणि डिंपल यांनी सोबत अनेक चित्रपट केले आणि ही जोडी सुपरहिट ठरली. 1984 मध्ये, सनी आणि डिंपल यांनी प्रथमच मंजिल-मंजिल या चित्रपटात काम केले.

जेव्हा लोकांमध्ये या जोडीची लोकप्रियता वाढली, तेव्हा दिग्दर्शकांनी देखील ही जोडी स्वीकारण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर दोघांनी ‘अर्जुन’, ‘आग का गोला’, ‘नरसिम्हा’ आणि ‘गुनाह’ या चित्रपटांमध्ये काम केले. आता प्रत्येक दिग्दर्शकाने या जोडीबरोबर चित्रपट बनवायला सुरुवात केली होती. सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांचे प्रेम प्रकरण एकेकाळी चर्चेचा विषय झाले होते परंतु त्यावेळी दोघेही विवाहित होते.

त्यावेळच्या बातमीनुसार चित्रपटांमध्ये प्रेमी युगुलाचा रोल करता करता सनी आणि डिंपलने खऱ्या आयुष्यातही एकमेकांवर प्रेम करायला लागले होते. असे म्हटले जाते की जेव्हा दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले, त्यावेळी डिंपल राजेश खन्नापासून दूर होती. अभिनेता सनी देओलचेही नवीनच लग्न झाले होते, परंतु तरीही त्याने डिंपलवर खूप प्रेम करायला सुरुवात केली.

अलीकडेच त्यांचे प्रेम पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले जेव्हा ते दोघे लंडनमध्ये एकमेकां सोबत फिरताना दिसले. त्यांचे सोबत फिरतानाचे फोटोज कॅमेऱ्यात कैद झाले आणि सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. सनी आणि डिंपल एकमेकांपासून दूर राहिले परंतु तरीही असे दिसते आहे की हे दोघे एकमेकांना विसरले नाहीत.

सूत्रांच्या माहितीनुसार या दोघांची प्रेमकथा 11 वर्षे चालली होती आणि दोघांनीही गुप्तपणे लग्न केल्याचीही माहिती आहे. तथापि, या दोघांनीही यावर कधीच सहमती दर्शवली नाही.