‘3 वर्षांची असतानाच माझा विनय-भंग झाला होता’ ‘दंगल’ अभिनेत्री फातिमाचा धक्कादायक खुलासा

‘बॉलिवूड’ नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय हिंदी चित्रपट सृष्टी ही कायमच चर्चेत असते. सध्या कोरोना मुळे जरी चित्रपटांचे प्रदर्शन स्थगित असले तरी अश्या अनेक घडामोडी इथे घडत असतात ज्यामुळे इथले कलाकार कायमच चर्चेत असतात. नुकतंच एक नवख्या अभिनेत्रीने केलेल्या खळबळजनक खुलास्याने बॉलीवूड मध्ये पुन्हा चर्चेला उधाण आलंय.

‘दंगल’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री फातिमा सना शेख हिने वयाच्या तिसऱ्या वर्षी तिचा विनय-भंग झाल्याचा धक्कादायक खुलासा केला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने अभिनेत्री म्हणून तिला कोणकोणत्या संकटांना सामोरं जावं लागलं आणि इंडस्ट्रीत तिला कोणता अनुभव आला याबद्दल सांगितलं.

‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “तुला इंडस्ट्रीत फक्त सेक्सच्या बदल्यात काम मिळेल असं अनेकांनी मला सांगितलं. अनेकदा मी माझी नोकरी गमावली आहे. फक्त बॉलिवूडच नाही तर प्रत्येक इंडस्ट्रीत स्त्री-पुरुष भेदभाव होतो.’

‘मी जेव्हा तीन वर्षांची होते, तेव्हा माझा विनयभंग झाला होता. त्यामुळे ही समस्या ती खोलवर आहे हे तुम्ही समजू शकता. प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो. प्रत्येक स्त्री, प्रत्येक अल्पसंख्याक दररोज संघर्ष करतोय.” असे म्हणत तिने स्त्रियांना दररोज सामोरे जाव्या लागणाऱ्या संकटांना वाचा फोडली आहे

फातिमाला इंडस्ट्रीत अनेकदा तिच्या लूकवरून नाकारण्यात आलं. याविषयी तिने पुढे सांगितलं, “तू कधीच हिरोइन बनू शकत नाही, असं मला अनेकांनी सांगितलं होतं. तू दीपिका, ऐश्वर्या यांच्यासारखी दिसत नाहीस, तर तू हिरोइन कशी होशील? असं मला सुनावण्यात आलं होतं. त्यांच्यासाठी सौंदर्याची परिभाषा तशी होती. पण मी या चौकटीत बसत नाही. पण आता माझ्यासारख्या मुलींना संधी मिळतेय.”

फातिमा सना शेख हिने 1997 मध्ये बाल कलाकार म्हणून करिअरची सुरूवात केली तिने ‘चाची 420’ मध्ये कमल हासनच्या मुलीची भूमिका साकारली. 2016 गाजलेला कुस्ती वरचा चित्रपट ‘दंगल’ मध्ये मुख्य भूमिका साकारून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, ज्यात आमिर खान आणि सान्या मल्होत्रा यांच्यासह मुख्य भूमिका होती.

2018 मध्ये, फातिमा ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटाचा भाग होती, ज्यामध्ये तिने पुन्हा आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासह स्क्रीन स्पेस शेअर केली. फातिमा सना शेख आता नेटफ्लिक्सचा चित्रपट ‘लुडो’मध्ये दिसणार आहे जो १२ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. त्याच बरोबर तिचा ‘सुरज पे मंगल भारी’ हा चित्रपट देखील लवकरच आपल्या भेटीला येतोय.