70च्या दशकातील ‘सौंदर्याचा ऍटम बॉ-म्ब’ असलेल्या या अभिनेत्रीचा नंतर असा झाला दुर्दैवी शेवट..

आपल्या मराठी चित्रपट सृष्टीला भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये बहुमानाचे स्थान आहे. त्याचे कारण आहे मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेले दिग्गज कलाकार. अर्थातच भारतात चित्रपट आणला तो सर्वपरिचित दादासाहेब फाळके या मराठी माणसानेच. त्यांच्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर या दिग्गजांनी ही परंपरा पुढे कायम ठेवली.

अशा वेळी जेव्हा या इंडस्ट्री मध्ये फक्त अभिनेत्यांचा दबदबा कायम होता त्यावेळी अभिनेत्र्यांना फक्त नावापुरते रोल मिळत असत. नंतर मग या इंडस्ट्रीमध्ये अशा काही अभिनेत्र्यांनी एन्ट्री केली ज्यांच्या येण्याने हे चित्र पालटले. अनेक स्त्रीप्रधान पात्रांचे चित्रपट चित्रित करण्यात आले. अभिनेत्री स्मिता पाटील, किशोरी शहाणे अश्या अनेक अभिनेत्र्यानी एक काळ गाजवला.

अशातच एक अभिनेत्री अजून होती, जिचे करिअर फार काळ नव्हते, परंतु तिने जितके चित्रपट केले तेव्हा तेव्हा ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आणि फक्त चित्रपटच नव्हे तर नाट्य रंगभूमीवर सुद्धा तिला लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले. होय आम्ही बोलत आहोत अभिनेत्री पद्मा चव्हाण यांच्या बद्दल.

पद्मा चव्हाण यांचा जन्म कोल्हापूर येथे 7 जुलै 1944 रोजी झाला. लहानपणीपासूनच पद्मा यांना अभिनय व नृत्य तसेच इतर कलांची आवड होती. त्यामुळे त्यांनी प्राथमिक शिक्षण घेऊन शिक्षणाला रामराम ठोकला. त्यांना चंदेरी दुनियेची ओढ लागली होती. त्यांचे वडील कॅप्टन अण्णासाहेब चव्हाण आधुनिक विचारांचे असल्याने त्यांनी आपल्या कन्येला कधीच विरोध नाही केला.

भाव बदलणारा सुरेख चेहरा, बोलके डोळे तसेच अभिनेत्रीला आवश्यक असणारे आकर्षक व्यक्तिमत्त्व त्यांच्या कडे जन्मजातच होते जणू. म्हणूनच की काय त्यांना पडद्यावर झळकण्यासाठी जास्त वेळ स्ट्रगल करावा लागला नाही. वर्ष 1959 साली वयाच्या 15व्या वर्षीच भालजी पेंढारकर यांच्या “आकाशगंगा” चित्रपटात पद्मा यांना भूमीका मिळाली आणि त्यांनी चंदेरी दुनियेत पाऊल ठेवले.

चित्रपटांसोबतच नाट्यमंचा वरही त्यांचे आगमन झाले. त्यांचे अभिनय शहरी व ग्रामीण कथानकानाही पूरक होते. दिलखेचक व बिंधास्त अभिनय आणि अप्रतिम सौंदर्यासाठी त्या ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांच्या अभिनयामुळे ‘महाराष्ट्राची मर्लिन मनरो’ व ‘सौंदर्याचा ऍटम बॉ-म्ब’ हे खिताब आचार्य अत्रे यांनी त्यांना बहाल केले होते.

गुंतता हृदय हे या नाटकातील कल्याणी, नवऱ्याची धमाल तर बायकोची कमाल या नाटकातील सुनीता, माझी बायको माझी मेव्हणी मधील रसिका, लग्नाची बेदी मधील रश्मी, अश्या त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या. या भूमिकांमुळे प्रेक्षकांनी त्यांची नाटके डोक्यावर घेतली व पद्मा या रंगभूमी क्षेत्रात सुपरस्टार झाल्या.

अभिनयाची घोडदौड सुरू असताना दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांच्यासोबत 1966 साली पद्मा यांचा विवाह झाला. पद्मा यांनी आकाशगंगा, अवघाची संसार, जोतीबाचा नवस, संगत जडली तुझी न माझी, बोट लावीन तिथे गुदगुल्या, लाखात अशी देखणी सारख्या अनेक मराठी चित्रपटात अभिनय केला. सुमारे 28 मराठी चित्रपटात त्यांनी भूमिका बजावली.

मराठी सोबतच पद्मा यांनी हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अनेक वेळा खलनायकी भूमिका देखील केल्या. वर्ष 1968 मध्ये ‘आदमी’ या चित्रपटात त्या अशोक कुमार, मनोजकुमार, वहिदा रहमान यांच्यासोबत झळकल्या. वर्ष 1963 मधील बिन बादल बरसात या चित्रपटात तर कश्मीर की कली मध्ये त्यांनी शम्मी कपूर, शर्मिला टागोर, प्राण यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे.

वर्ष 1975 मध्ये या सुखांनो या आणि वर्ष 1976 मध्ये आराम हराम है या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले होते. या काळात त्या आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीच्या यशाच्या शिखरावर होत्या. एका मोटार अप-घा-तात 12 सप्टेंबर 1996 रोजी या अभिनेत्रीचे दु-र्दै-वी नि-ध-न झाले.