सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बहेरेचा नवरा आहे साऊथ इंडियन चित्रपटातील हे सुप्रसिद्ध नाव.. दिग्गजांसोबत केले आहे काम..

मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे लाडक्या अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रार्थना सोशल मिडीयावर सतत सक्रीय असलेली पाहायला मिळते. तसेच ती तिचे आणि कुटुंबाचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर करत असते.

प्रार्थनाने काही दिवसांपूर्वी आपल्या सासुसोबतचे फोटोज शेअर केलेले पाहायला मिळतील. या फोटोच्या निष्कर्षातून तिच आणि सासूच एकमेकीमधील उत्तम बोन्डीग असल्याचे समजते. तसेच एकमेकींसोबत वेळ घालवताना त्या खुश दिसत आहेत.

प्रार्थना बेहेरेच्या सासूचे नाव सरिता जावकर असून मदर्स डेच्या दिवशी तिने सासुसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेले पाहायला मिळतात. प्रार्थनाची सासू तिच्यावर मुलीसारखी माया करते. प्रार्थनाची सासूदेखील प्रार्थनासोबतचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असते. त्यांच्या या फोटोज मधून त्यांचे एकमेकींप्रती प्रेम दिसून येते.

अभिनेत्री प्रार्थना बेहरेच लेखक आणि निर्देशक अभिषेक जावसकरसोबत लग्न झाल आहे. प्रार्थनाने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तिने अंकिता लोखंडे आणि सुशांत सिह राजपूत यांच्या सोबत हिंदी सिरीअल ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत देखील काम केले आहे.

प्रार्थनाने मालिकेमधील काम सोडून चित्रपटांकडे लक्ष केंद्रित केले. तिने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. तिला तिच्या कुटुंबाकडून कामासाठी खूप सपोर्ट मिळत असल्याचे समजते. तसेच प्रार्थनाचा नवरा अभिषेक लेखक आणि निर्देशकसोबतच साउथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डीस्ट्रीब्यूटर आहे. तसेच त्याने ‘डब्बा यैस पैस’, ‘सॉल्ट आणि प्रेम’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटाचे सहनिर्मिती केली आहे.

अभिषेकने काही चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे. प्रार्थना लवकरच एका हिंदी वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. तसेच हाती आलेल्या माहितीनुसार प्रार्थना ‘छूमंतर’ या मराठी सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटात प्रार्थनासोबत रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी, आणि ऋषी सक्सेना दिसणार आहेत. या चित्रपटाचे शुटींग लंडनमध्ये झाले आहे.