अरेच्चा.. पँट घालायलाच विसरली ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री.. सोशल मीडियावर झाली ट्रोल…

बॉलिवूड ही एक अशी इंडस्ट्री आहे ज्यात रोज काहीना काही घटना घडतच असतात. मीडिया आणि सोशल मीडियावर वर बॉलिवूड हे दिवसरात्र चर्चेचा विषय असते. यातील काही घटना या नकळत घडतात तर काही चर्चेत राहण्यासाठी मुद्दामून घडवून आणल्या असतात. मग त्या वैयक्तिक प्रमोशन साठी असो किंवा एखाद्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी.

बॉलीवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टी मध्ये रकुल प्रीत सिंह हे सर्व परिचित असे नाव आहे. साउथ इंडस्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये अभिनयाच्या जोरावर खास स्थान मिळवलेल्या रकुल प्रीत सिंग आपल्या मस्त स्टाईलसाठी ओळखली जाते. त्याच बरोबर ती प्रसिद्ध आहे तिच्या सोशल मीडिया अकाउंट बद्दल.

रकुल प्रीत सिंग सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. सोशल मीडियाचा वापर ती स्वत: चे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून तिच्या चाहत्यांना तिच्याबद्दल अप टू डेट ठेवण्यासाठी करते. अभिनेत्री अनेकदा सोशल मीडियावर फॅशन आणि फिटनेसचे व्हिडिओ शेअर करून आपल्या फॅन्सना माहिती देते.

जरी ती तिच्या गोड आणि डाउन-टू-अर्थ व्यक्तिमत्त्वासाठी परिचित असली, तरी जेव्हा तिला कोणी ट्रोल करतं तेव्हा मात्र तिला हे सहन होत नाही आणि ती त्या गोष्टीला कडाडून विरोध करते. या गोष्टीची प्रचीती नुकतीच तिच्या चाहत्यांना आली जेव्हा तिने नुकताच एक फोटो शेअर केला होता.

या फोटोमध्ये ती शॉर्ट्स आणि डेनिम टॉप परिधान करुन आपल्या कारमधून बाहेर पडताना दिसत होती. परंतु तिने घातलेला शॉर्टस हे अगदीच छोटे होते. त्यामुळे ते दिसण्यात येत नव्हते. त्यामुळेच ती शॉर्टस न घालताच बाहेर पडली की काय असा भास चाहत्यांना झाला. आणि त्याच प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या.

लोकांच्या वाईट साईट कमेंट्स बघून रकुल मात्र चांगलीच संतापली. एका ट्रॉलर ला उत्तर देत रकुल ने ‘स्वतःच्या आईबद्दल देखील असाच विचार करतो का’ अशी प्रतिक्रिया दिली. अनेकांनी रकुल च्या या कृतीच समर्थन देखील केलं. परंतु काहींनी पुन्हा ट्रोल केलं.

रकुल प्रीत सिंह नुकतीच बॉलिवूडच्या दे दे प्यार दे चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात रकुल सोबत आणखी तब्बू आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. हा चित्रपट मागील वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. रकुल प्रीतने अय्यारी आणि यारियां या बॉलिवूड चित्रपटांव्यतिरिक्त अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री रकुल प्रीत ने एका मुलाखतीत हिंट दिली आहे की दे दे प्यार दे या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांसमोर येऊ शकतो.

रकुल ने सांगितले की चित्रपटाच्या सिक्वेलची विचार करूनच क्लायमॅक्स लिखाण केले गेले होते. हा चित्रपट सुपारहिट ठरला आणि रकुल या चित्रपटातुन बॉलिवूड मध्ये प्रसिद्ध झाली. शिवाय मी सुद्धा निर्मात्यांच्या सतत संपर्कात आहे. याव्यतिरिक्त रकुल लवकरच जॉन अब्राहम आणि जॅकलीन सोबत अ-टॅ-क या चित्रपटामध्ये सुद्धा दिसणार आहे. हा एक ॲ-क्शन पट आहे. तसेच ती अर्जुन कपूर सोबत सुद्धा एक चित्रपट करत आहे मात्र या चित्रपटाचे नाव अजून समोर आलेले नाही.