बोल्ड फोटोशूटमुळे ‘ही’ अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत.. ब्लाऊज घालायला विसरली म्हणून नेटकर्यांनी केलं ट्रोल..

बॉलिवूड ही एक अशी इंडस्ट्री आहे ज्यात रोज काहीना काही घटना घडतच असतात. मीडिया आणि सोशल मीडियावर वर बॉलिवूड हे दिवसरात्र चर्चेचा विषय असते. यातील काही घटना या नकळत घडतात तर काही चर्चेत राहण्यासाठी मुद्दामून घडवून आणल्या असतात. मग त्या वैयक्तिक प्रमोशन साठी असो किंवा एखाद्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी.

दिग्गज अभिनेते सैफ अली खान यांची मुलगी अभिनेत्री सारा अली खान आपल्या पारंपरिक फॅशन आणि हटके स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. सारा भारतीय पारंपरिक पोषाख अतिशय आत्मविश्वासाने कॅरी करते. आकर्षक पॅटर्नमधील दागिने प्रिंटेड क्लासिक चिकन वर्क कुर्ता, स्टायलिश फुटवेअर आणि मल्टी हाइनेट टाई-डाई किंवा ब्लॉक प्रिंट दुपट्ट्यासह सुंदर रंगसंगतीची निवड कशी करावी, हे साराला चांगलेच ठाऊक आहे.

सैफ प्रमाणेच सारा ही अभिनय क्षेत्रात उतरली.तसंच कोणत्या प्रकारच्या कपड्यांना कशा पद्धतीने स्टाइल करावं, याचेही उत्तम ज्ञान सारा अली खानला आहे. तसंच आपली बारीक कंबर आणि पाय हायलाइट करण्यासाठी सारा कधी-कधी ग्लॅमरस कपडे देखील परिधान करते. पण क्लासिक, सुंदर व मोहक पारंपरिक लुकमध्ये बोल्ड प्रयोग केल्यानं या अभिनेत्रीवर ट्रोल होण्याचीही वेळ येते. याचेच उदाहरण नुकतेच पाहायला मिळालंय.

घायाळ करणाऱ्या अदा आणि ग्लॅमरस लुकमुळे अभिनेत्री सारा अली खान सध्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध डिझाइनर्सची पहिली आवड व निवड ठरतेय. या अभिनेत्रीचे नेहमीच कम्फर्टेबल आणि सुंदर आउटफिट्समधील फोटो पाहायला मिळतात. नुकतेच प्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राने त्याच्या ‘नूरानियत’ या लेटेस्ट कलेक्शनमधील आकर्षक डिझाइनर आउटफिट्स लाँच केले आहेत

यासाठी त्यानं मॉडेल म्हणून साराची निवड केली. या कलेक्शनच्या शूटिंगसाठी साराने सुंदर लेहंगा परिधान केला होता. या डिझाइनर लेहंग्यामध्ये बॅकलेस ब्लाउजचा समावेश होता. ज्याचे डिझाइन प्रचंड आकर्षक होतं. पण साराचे बॅक साइड पोझ फोटो पाहून नेटिझन्सकडून तिच्यावर निशाणा साधण्यात आला.

सारा या डिझाइनर लेहंग्यामध्ये प्रचंड सुंदर दिसतेय, यात काहीच शंका नाहीय. पण लोकांना तिचा फुल स्लीव्ह्जचा बॅकलेस ब्लाउज अजिबात आवडला नाही. अनेकांनी तर ती ब्लाऊज घालायला विसरली अशा कमेंट केल्या. यास ‘इसरार’ चोली असंही म्हटलं जातं. अशा पद्धतीच्या ब्लाउजमध्ये स्त्रियांचा मानेपासून ते कमरेपर्यंतचा भाग एका विशेष प्रकारच्या फॅब्रिकेनं झाकलेला असतो.

साधारणतः १६ ते १८व्या शतकादरम्यान युरोपमध्ये अशा प्रकारचा पोषाखांचा ट्रेंड जोमात होता. साराने परिधान केलेल्या या लेहंग्याचे पॅटर्न देखील अशाच प्रकारचे होते. पेस्टल शेड असणाऱ्या या लेहंग्यामधील ब्लाउज पुढील बाजूने राउंड नेकलाइन डिझाइनमध्ये होते. या ब्लाउजवर लेहंग्याशीच मिळते-जुळते डिझाइन आपण पाहू शकता.

या ब्लाउजचे डिझाइन बॅकलेस जरी असले तरी ब्लाउजमध्ये साराच्या त्वचेशी मॅचिंग रंगाचे फॅब्रिक वापरण्यात आलं होतं. या ब्लाउजचे डिझाइन पुढील बाजूने देखील बोल्ड स्वरुपातील होते. तसंच मनीष मल्होत्राने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये साराच्या चेहऱ्यावर किचिंतशी भीती दिसतेय.

त्यामुळे सारा अली खान या आउटफिटमध्ये कम्फर्टेबल नव्हती का? असा प्रश्न अनेकांना पडलाय. दरम्यान साराने या लुकसाठी सुंदर मेकअप व हेअर स्टाइल केली होती. डार्क फाउंडेशनसह स्मोकी लिप्स, डार्क कोहल आईज, चमचमते आयशॅडो आणि पफी हेअर स्टाइलमध्ये साराचा लुक परफेक्ट दिसतोय.