पडद्यावर सोज्वळ दिसणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ झाला लीक ? होतोय तुफान व्हायरल..

झी मराठी आणि मराठी माणूस यांच्यात एक अतूट नातं आहे. झी मराठी वर अश्या अनेक सीरिअल्स आल्या आहेत ज्या संपून एक मोठा काळ उलगडला तरीही अजूनही त्या प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. ‘काही दिया परदेस’ नावाची एक मालिका काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 2018 साली या मालिकेने आपला निरोप घेतला.

बनारसचा मुलगा आणि मुंबईची मराठी मुलगी यांची प्रेमकहाणी आपण ‘काहे दिया परदेस’ या मालिकेत बघितली. अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय ठरली. या मालिकेतून सायली संजीव आणि ऋषी सक्सेना हे दोन नवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि प्रेक्षकांच्या घरातील अविभाज्य भाग बनले.

काही वर्षांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण मालिका संपली असली तरी या मालिकेच्या आठणी मात्र चाहत्यांच्या हृदयात कायम कोरलेल्या आहेत. ही मालिका संपल्यानंतर प्रेक्षकांची लाडकी गौरी अर्थातच अभिनेत्री सायली संजीव कुठे बिझी आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

नुकताच सायलीचा वाढदिवस झाला. मुळची नाशिकची असलेल्या सायलीने 31 जानेवारी रोजी वयाची 30 वर्षे पूर्ण केली आहेत. नुकतंच सायली ने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावरून पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार असल्याची चाहूल दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया, आता कोणत्या कलाकृतीमधून सायली येणार आहे प्रेक्षकांच्या भेटीला..

सायली एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘झिम्मा’ असं आहे. नुकतंच तिनं सोशल मीडियावर या चित्रपटाचा ट्रेलर पोस्ट करुन याबाबत चाहत्यांना माहिती दिली. परंतु हा ट्रेलर चित्रपटापेक्षा सायलीच्या बोल्ड दृश्यांमुळं अधिक चर्चेत आहे.

या व्हिडीओमध्ये सायलीचा नेहमीपेक्षा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. यामध्ये तिनं चक्क बाथ सीन केला आहे. या सीनमुळं चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देत सायलीचं कौतुक केलं आहे.

‘झिम्मा’ हा चित्रपट येत्या 23 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. हेमंत ढोमे यानं चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटसृष्टी, रंगमंच, टेलिव्हिजन गाजवणारे कलाकार यात पाहायला मिळणार आहेत. दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी या आधी देखील मराठी चित्रपट सृष्टीला असे अनेक मल्टी स्टारर चित्रपट दिले आहेत.

क्षिती जोग, सुहास जोशी, मृण्मयी गोडबोले, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव आणि निर्मिती सावंत या कसलेल्या कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. तगड्या कलाकारांची फळी यात असल्यामुळे आता ‘झिम्मा’मध्ये काय दडलंय हे लवकरच कळेल.

या चित्रपटा आधी सायली हा चित्रपट शंतनू रोडे दिग्दर्शित ”गोष्ट एका पैठणीची” या चित्रपटात दिसली होती. चित्रपटात सायलीसोबत ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता सुव्रत जोशी मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर खास कमाई करू शकला नाही.