12 बॉयफ्रेंड बदलून ही अभिनेत्री म्हणतेय सगळेच मर्द धोखेबाज.. आता करतेय 17वर्ष लहान मुलाला डेट..

प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याने लवकरात लवकर लग्न करून कौटुंबिक जीवनाची सुरुवात करावी. अनेक जण प्रेमाच्या बंधनात अडकतात आणि पुढे त्याच व्यक्ती सोबत विवाह करून संसार थाटतात. परंतु सर्वांच्याच नशिबी हे सुख असतेच असे नाही. बर्‍याच वेळा एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर लोक प्रेम करून बसतात आणि मग त्याच व्यक्तीसोबत लग्न करायच्या आग्रहामुळे ते अविवाहित राहण्याची देखील वेळ येऊ शकते.

त्याच वेळी, असे काही लोक आहेत जे लग्नासाठी त्यांच्या खऱ्या प्रेमाच्या शोधात असतात, परंतु त्यांचा शोध कधीच पूर्ण होत नाही. आणि मग मनासारखा जोडीदार न मिळाल्याने त्यांना अविवाहित आयुष्य व्यतीत करावं लागतं. अशा लोकांचं लग्न करून छानसं कुटुंब सुरू करण्याचं स्वप्न अधुरेच राहते.

सर्वसामान्य व्यक्तीच नव्हे तर बॉलिवूड मध्ये देखील असे अनेक कलाकार आहेत जे खऱ्या प्रेमाच्या शोधात राहिले आणि आता अविवाहित जीवन जगतायत. आज आपण अशाच एक अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जिचे नाव एक दोन नव्हे तर 13 लोकांसोबत जोडलं गेलं परंतु ती अजूनही अविवाहितच राहिली आहे.

आम्ही बोलत आहोत बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सुष्मीता सेन यांच्याबद्दल. होय, अनेकांना या गोष्टीवर विश्वास नाही बसणार परंतु सुष्मीता ही अभिनेत्री कायमच आपल्या रिलेशनशिप्स मूळे चर्चेत असते. तिचे आतापर्यंत तब्बल 12 वेळा ब्रेक अप झाले आहे. आणि नुकतीच ती एका अशा व्यक्तीला डेट करत आहे जी तिच्या पेक्षा तब्बल 17 वर्षे लहान आहे. आणि यामुळेच ती बॉलिवूड मध्ये पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.

आपल्या अभिनयासोबतच अनेक तरुणींसाठी फिटनेस आयकॉन असणारी अभिनेत्री सुष्मिता सेन हिने नुमतीच वयाची 45 वर्षे पूर्ण केली आहेत. सुष्मिताचा जन्म 19 नोव्हेंबर 1975 रोजी हैदराबाद येथे झाला. 1994 मध्ये झालेल्या मिस युनिवर्स स्पर्धेत विजेतेपदाचा मान पटकावणारी सुष्मिता पहिली भारतीय महिला होती. त्यावेळी ती केवळ 18 वर्षांची होती. सर्वांना आपल्या सौंदर्याने मंत्रमुग्ध करणाऱ्या सुष्मिताचे आयुष्य कायमच वादविवादाने भरलेले होते.

सुष्मिताने आपल्या कारकीर्दीत 12 हून अधिक अभिनेते आणि व्यवसायिकांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आहे, ज्यात तिने आतापर्यंत संजय नारंग, विक्रम भट्ट, मुदस्सर अजीज, अनिल अंबानी, साबिर भाटिया, हृतिक भसीन, रणदीप हूडा, बंटी सजदेह, मानव मेनन, इम्तियाज खत्री, वसीम अक्रम सारख्या 12 हून अधिक व्यक्तींना डेट केलं आहे. सुष्मितानेही एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला होता की तिला अनेकदा फसवले गेले आहे आणि सगळेच मर्द धोखेबाज आहेत. बॉलिवूडची माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन सध्या रोहमन शालम ला डेट करत आहे. आणि त्यांचे रिलेशनशिप सध्या चर्चेत आहे कारण रोहमन हा सुष्मीता पेक्षा चक्क 17 वर्षे लहान आहे.

एका मुलाखतीत सुष्मिता सेनने म्हटले आहे की, “रोहमन शौलमने सुरुवातीच्या काळात आपले वय तिच्यापासून लपवले.” अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, “दोघांची सुरुवात इंस्टाग्रामद्वारे झाली. येथे दोघांची नजीक वाढली आणि दोघांनी भेटण्याचा निर्णय घेतला, सुष्मिता सेन यांना नंतर रोहमन तिच्यापेक्षा 17 वर्षांनी लहान असल्याचे समजले. महेश भट्ट यांच्या ‘दस्तक’ या चित्रपटाद्वारे सुष्मिता सेनने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. यासह तिने ‘बीवी नंबर 1’, ‘बेवफा’, ‘मैने प्यार क्यूं क्या’, ‘जिंदगी रॉक्स’, ‘नो प्रॉब्लम’ दुल्हा मिल गया या सिनेमांमध्येही काम केले आहे.