धक्कादायक: या मराठमोळ्या अभिनेत्रीने केलं न्यू-ड फोटोशूट.. सई ताम्हणकरने केलं तोंडभरून कौतुक..

नुकतंच २०२१ या नव्या वर्षाला सुरूवात झाली. नवं वर्ष, नवा संकल्प असं अनेकांच असतं. नव्या वर्षात नवीन काही तरी करायचा प्रत्येकाचा संकल्प असतो. या नव्या संकल्पाला अभिनेत्री वनिता खरातने सुरूवात केली आहे. वनिता खरातने वर्षाच्या पहिल्याच दिवशी अतिशय बोल्ड फोटो शेअर केला आहे.

मराठी अभिनेत्री वनिता खरातने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एक फोटो शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. २०१९मध्ये आलेल्या कबीर सिंग या सिनेमात मोलकरणीची छोटीशी भूमिका साकारणारी वनिता सगळ्यांच्याच लक्षात राहिली. मात्र, सध्या वनिताच्या नावाची चर्चा सुरू आहे ती, तिने केलेल्या न्यू-ड फोटोशूटमुळे.

अभिनेत्री वनिता खरातने एका कॅलेंडरसाठी हे फोटोशुट केलं आहे. आपल्या वजनाचा आणि शरीराबद्दलचा कोणताही न्यूनगंड न बाळतगता वनिताने बोल्ड फोटो शेअर केला आहे. सर्वत्र या फोटोची चर्चा होत असून हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. वनिताने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना यासोबत एक पोस्टही लिहिली आहे.

“मला माझ्या गुणवत्तेचा अभिमान आहे. माझी आवड, माझा आत्मविश्वास, मला माझ्या शरीरावर अभिमान आहे. कारण मी मी आहे…!!!,” अशा भावना वनिताने व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी या फोटोची स्तुती केली तसेच याची टीका देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. तर अनेकांना हा फक्त एक पब्लिसिटी स्टंट वाटत आहे.

वनिता खरातने शेअर केलेला हा बोल्ड फोटो फक्त शाब्दिकरित्या बोल्ड नसून तो वैचारिकदृष्ट्या ही बोल्ड आहे. आपल्या वजनाचा न्यूनगंड कुठेही न बाळतगता वनिता खरातने हा फोटो शेअर केला आहे. अश्या प्रकार हा प्रयोग मराठी मध्ये पहिल्यांदा झाला नसून आधी वर्षा उसगावकर यांनीही टॉप-लेस फोटोज एका मॅगेझिन ला दिले होते.

वनिता खरातची लक्षवेधी भूमिका राहिली ती “कबीर सिंग’ या सिनेमात. या सिनेमात वनिताने शाहीद कपूरच्या नोकर महिलेची भूमिका साकारली आहे. लोकप्रिय होण्याकरता एक सीनच काफी असतो हे वाक्य वनिताच्या बाबतीत खरं ठरलं आहे. एका सीन करता वनिता भरपूर पळाली पण या सीनने तिला लोकप्रियता मिळवून दिली आहे. तसेच वनिताने ‘हास्य जत्रा’ या कॉमेडी शोमध्ये देखील धमाल उडवली आहे.

वनिताने बॉडीशेम करणाऱ्यांना हे फोटोशूट करून संदेश दिला आहे. त्याचबरोबर #bodypositivity असा हॅशटॅगही वनिताने वापरला आहे. तिचं मराठी कलाकारांकडून आणि सोशल मीडियावर कौतूक होत आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरनेही वनिताचं या फोटोशूटबद्दल कौतूक केलं आहे.