बॉलिवूडच्या ‘या’ फ्लॉप अभिनेत्र्यांनी लढवली शक्कल.. अब्जाधीश नवरे करून झाल्या करोडोंच्या मालकीण.. 4नंबर तर..

बॉलिवूड ही एक अशी इंडस्ट्री आहे ज्यात पाऊल ठेवल्यानंतर कलाकार एकतर सातव्या आस्मानात असतो.. किंवा मग थेट जमिनीवर आदळतो. परंतु एक गोष्ट नक्की की जमिनीवर आदळला तरी लोकांच्या नजरेत मात्र तो कलाकार कायम राहत असतो. आपले नशीब चमकावे या आशेने प्रत्येक कलाकार आपल्या पहिल्या वहिल्या चित्रपटाबद्दल खूपच उत्सुक असतो.. परंतु प्रत्येकाचं नशिब चमकतेच असे नाही. अनेकांच्या पदरात निराशा देखील पडते.

आज आम्ही तुम्हाला अशा काही अभिनेत्र्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांची बॉलिवूड करिअर ची सुरुवात खूप चांगली झाली, परंतु नंतर त्या आपली लोकप्रियता टिकवू नाही शकल्या. त्यामुळे त्यांना इंडस्ट्री तर सोडावी लागली पण त्या आधी त्यांनी शक्कल लढवून अब्जाधीशांसोबत लग्न केलं.. आणि आता करोडोंच्या मालकीण आहेत. तर चला जाणून घेऊयात कोण आहेत या अभिनेत्र्या..

टीना मुमीन– अंबानी: बॉलिवूडची एकेकाळची टॉप ची अभिनेत्री असलेल्या ‘टीना मुमीन’ला सगळेच परिचित आहेत. कर्ज, रॉकी सारख्या अनेक चित्रपटांतुन टीना झळकली आणि तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली. तिची सुरुवातीच्या काही चित्रपटात तुफान गाजलेली टीना नंतर मात्र काही खास कामगिरी करू शकली नाही.

हळूहळू तिची लोकप्रियता कमी होऊ लागली. अशात तिची मैत्री रिलायन्स ग्रुपचे मालक अनिल अंबानी यांच्यासोबत झाली. नंतर मग दोघे विवाहबंधनात अडकले. टीना आता रिलायन्स समूहाच्या सामाजिक कार्याला चालना देण्यासाठी कार्य करते आहे. टीनाच्या नेतृत्वात कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आणि सिल्वर फाऊंडेशन चालवले जात आहेत. टीना लग्नापूर्वी बॉलिवूडची एक सुप्रसिद्ध अभिनेत्री होती. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूड जगताला कायमचा निरोप दिला.

शिल्पा शेट्टी-कुंद्रा: बॉलिवूडचे परफेक्ट पॅकेज म्हटल्या जाणाऱ्या सुंदर शिल्पा शेट्टीने लंडनमधील उद्योगपती राज कुंद्राशी 22 नोव्हेंबर 2009 रोजी लग्न केले. शिल्पा ही राजची दुसरी पत्नी आहे . शिल्पाने बॉलिवूडमध्ये बरेच नाव कमावले आहे. शिल्पा नेहमीच तिच्या परफेक्ट फिगरबद्दल चर्चेत असते. राजने शिल्पाला आयपीएल टीम राजस्थान रॉयल्स भेट म्हणून दिली.

सेलिना जेटली: बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सेलिना जेटलीने 2003 मध्ये ‘जानशीन’ या चित्रपटाद्वारे चित्रपटापासून पदार्पण केले होते. एवढेच नाही सेलिनाने मिस युनिव्हर्सचा खिताब ही जिंकला आहे. सेलिनाने बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले पण फारसे यश मिळू शकले नाही. नंतर मग तिनेऑस्ट्रियन व्यावसायिक पीटर हग सोबत लग्न केले. सेलिनाचा नवरा दुबई आणि सिंगापूरमध्येही बरीच मोठी हॉटेल चालवतो.

असिन: आमिर खान सोबत ‘गजनी’ या चित्रपटात असिन पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये झळकली. गजनी मधील असिन च्या कामाची फार प्रशंसा झाली. पण त्यांनतर मात्र असिन ला फारशी संधी मिळाली नाही. नंतर एक दोन चित्रपट आले परंतु त्यातही असिन काही फारशी उल्लेखनीय कामगिरी करू शकली नाही. नंतर मग असिनने मायक्रो मॅक्स कंपनीचे संस्थापक राहुल शर्माशी लग्न केले. असिनने राहुल शर्माशी लग्न केले तेव्हा त्यांची संपत्ती जवळपास 5000 कोटी रुपयांच्या जवळपास होती.

आयेशा टाकीया: बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकियाने 2004 मध्ये आलेल्या ‘टार्जन द वंडर कार’ या चित्रपटापासून सुरुवात केली. सलमान खान, आयशा टाकिया यांच्या फिल्मी करिअरबरोबर वाँटेड हा चित्रपट केल्यावर दंबग खान चर्चेत आला होता पण आयशाला तितकी प्रसिद्धी मिळाली नव्हती. तरीही एक काळ असा होता की आयेशाचे खूप चाहते होते. 2009 मध्ये तिने फरहान आझमीसोबत लग्न केले.आता त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सुमारे 74 कोटी आहे.

अमृता अरोरा: अमृता अरोराची चित्रपट कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच संपली होती. अमृताने बरेच चित्रपट केले पण तिचे सर्व चित्रपट फ्लॉप ठरले आणि ते बॉलीवूडच्या फ्लॉप अभिनेत्रींपैकी एक बनली. चित्रपटांमध्ये यश न मिळाल्यानंतर तिने बॉलिवूडचा निरोप घेऊन प्रसिद्ध व्यावसायिक शकील लडाक यांच्या बरोबर केले. शकील यांच्या बर्‍याच नामांकित कंपन्या आहेत ज्या इमारती बांधतात.