ऐश्वर्या मुळे झाला ‘बच्चन’ कुटुंबाच्या इज्जतीचा भाजीपाला, तिचा ‘काळाधंदा’ झाला उघड, रंगेहात…

बच्चन कुटुंब हे भारत आणि बॉलीवूडमधील एक अतिशय प्रसिद्ध कुटुंब आहे. अमिताभ बच्चन यांनी बच्चन कुटुंबाचा अभिमान जपण्यात कोणतीही कसर सोडली नाही. अमिताभ यांनी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनचा विवाह मिस युनिव्हर्स ऐश्वर्या रायसोबत लावून दिला, त्यानंतर ऐश बच्चन कुटुंबाची सून म्हणून राहू लागली.

ऐश्वर्या रायने लग्नानंतर फार कमी चित्रपट केले होते आणि तिने आपले घर सांभाळणे अधिक महत्त्वाचे मानले होते. हे कुटुंब संकटांपासून दूर असले तरी ऐश्वर्या राय काही वादात सापडल्याची धक्कादायक बातमी अलीकडेच समोर आली आहे.प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन. काही वर्षांपूर्वी ऐश्वर्या राय बच्चनबद्दल मोठी बातमी समोर आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पनामा पेपर्स प्रकरणी अभिनेत्रीला ईडीने समन्स बजावले होते. या अभिनेत्रीला चौकशीसाठी दिल्लीला बोलावण्यात आले होते. पनामा पेपर्समध्ये ऐश्वर्याचे नाव आल्यानंतर अमिताभ यांच्या घरात खळबळ उडाली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने ऐश्वर्या रॉयला प्रश्न विचारण्यासाठी एक यादी तयार केली होती.

पनामा प्रकरणात केवळ ऐश्वर्याच नाही तर तिचे सासरे अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक बड्या व्यक्तींची नावे होती. या सर्व लोकांवर कर फसवणुकीचा आरोप होता. मिळालेल्या माहितीनुसार, पनामा पेपर्स लीक प्रकरणात एका कंपनीची कायदेशीर कागदपत्रे लीक झाली होती.

हा डेटा जर्मन वृत्तपत्र Süddeutsche Zeitung (SZ) ने 3 एप्रिल 2016 रोजी Panama Papers या नावाने प्रसिद्ध केला होता. त्यात 190 हून अधिक देशांतील राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटींची नावे होती, ज्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप होता. यामध्ये 1977 ते 2015 अखेरपर्यंतची माहिती देण्यात आली होती.

चित्रपट कलाकार आणि उद्योगपतींसह 500 भारतीयांची नावे समाविष्ट होते. ऐश्वर्या राय देशाबाहेरील कंपनीची संचालक आणि शेअरहोल्डर होती. ऐश्वर्याशिवाय तिचे वडील, आई आणि भाऊ देखील कंपनीत तिचे भागीदार होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत सांगितले की, पनामा पेपर्स लीक प्रकरणात भारताशी संबंधित लोकांच्या एकूण 20,000 कोटी रुपयांच्या अघोषित संपत्तीचा खुलासा करण्यात आला आहे.

ऐश्वर्या राय बच्चनला समन्स बजावण्यात आले होते, ज्यामध्ये तिला 15 दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आले होते, परंतु ऐश्वर्याने त्यानंतर तिला मेलद्वारे उत्तर पाठवले होते. यानंतर आता त्याला पुन्हा बोलावून चौकशी केली जात आहे.आता ऐश्वर्या राय काय विधान करते हे पाहावे लागेल.