लग्न अभिषेकसोबत, पण KISS अजय देवगनला? त्या व्हायरल फोटोमुळे तुफान चर्चा

ऐश्वर्या रायला कोण ओळखत नाही. ती बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तिच्या अभिनयाने आणि आपल्या सौंदर्याने संपूर्ण जगाला वेड लावलं आहे. आता ती इंडस्ट्रित फारशी सक्रीय नसली तरी. तिचे अजूनही तेवढेच फॅन्स आहेत.

ऐश्वर्याच्या आयुष्याबद्दल सांगायचे, तर तिने बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन याच्याशी लग्न केलं. अभिषेक आणि ऐश्वर्याला एक मुलगी देखील आहे. ऐश्वर्या आता बच्चन कुटूंबाची सुन नाही तर मुलगी बनली आहे आणि ती तिचे सासरे अमिताभ बच्चन यांच्या फार जवळ आहे.

ऐश्वर्या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. त्यात आता पुन्हा एकदा ऐश्वर्या चर्चेत आली आहे ती एका फोटोमुळे. या फोटोमध्ये ऐश्वर्या अभिनेता अजय देवगन सोबत असं काही कृत्य करत आहे, जे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

या फोटोमध्ये असे दिसत आहे की, अजय देवगन आणि ऐश्वर्या एकमेकांना किस करत आहे. हा फोटो समोर येताच एकच खळबळ उडाली.नवरा अभिषेक बच्चन समोर अभिनेत्री असं कसं वागली हा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. तसेच यावर अमिताभ बच्चन यांची काय प्रतिक्रीया असेल असा प्रश्न उपस्थीत होऊ लागला.

या फोटोचं सत्य काय?

खरंतर हा फोटो पाहाताना ऐश्वर्या आणि अजय देवगन एकमेकांना किस करताना दिसत असले तरी, त्यांनी एकमेकांना किस केलेलं नाही. ते दोघेही एकमेकांची गळाभेट घेतानाचा हा फोटो आहे. परंतु ज्या ऍग्लने हा फोटो घेतला गेला आहे, त्यामुळे हे दोघेही किस घेत असल्यासारखे भासत आहे.

सोशल मीडियावर असा प्रकारे बऱ्याच गोष्टी ट्रेंड होत असतात. परंतु त्यापैकी सगळ्याच गोष्टी खऱ्या असतीलच असे नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी ती गोष्ट किती खरी आहे याची शाहनिशा नक्की करा.