जेव्हा ऐश्वर्याने अशा कपड्यात मारली एंट्री सासऱ्यासोबत सर्वच झाले घायाळ..

बॉलीवूडमध्ये बच्चन कुटुंबाचा खूप मोठा बोलबाला असतो. बच्चन कुटुंबीयांनी जे काही केले, त्याची चर्चाही मोठ्या प्रमाणात होत असते. अमिताभ बच्चन यांना अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन नंदा हे मुलं आहेत. अभिषेक बच्चन याने बॉलिवूडमध्ये रिफ्यूजी या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन जे.पी दत्ता यांनी केले होते. या चित्रपटानंतर अभिषेक बच्चन याला काही चित्रपट मिळाले. मात्र, त्याचे चित्रपट हे फारसे चालले नाहीत.

यामध्ये केवळ अपवाद होतात तो गुरु या चित्रपटाचा. गुरु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला होता. मात्र, या चित्रपटातही ऐश्वर्या राय भाव हिनेच खाल्लेला. मात्र, अभिषेक त्याच्या भूमिकेचे कौतुक या चित्रपटात झाले. ऐश्वर्या राय-बच्चन ही कायम चर्चेत असते. तिच्या लुकमुळे चर्चेत असते, तर कधी आपले सासरे अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती अधिक काळ असल्याने चर्चेत असते.

अभिषेक बच्चन आणि ती अनेकदा एकञ दिसतात. ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना एक मुलगी आहे. तिचे नाव आराध्या बच्चन आहे. ऐश्वर्या राय ही अनेकदा पार्ट्यांमध्ये जात असताना महागडे कपडे घालून जात असते. ऐश्वर्या राय बच्चनची कुठल्याही पार्टी किंवा इव्हेंटमध्ये एन्ट्री झाली की सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे जातात आणि कॅमेरे देखील तिच्याकडे वळतात. तिचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर धडपडत असतात.

काही दिवसांपूर्वी झालेल्या एका सोहळ्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि तिचे सासरे अमिताभ बच्चन यांच्यासोबत फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात रंगली आहे. ही गोष्ट आताची नाही तर 2009 मध्ये ही गोष्ट घडली होती. ऐश्वर्या राय अभिषेक बच्चन अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका पुरस्कार सोहळ्यासाठी सहभागी होण्यासाठी गेली होती. या वेळेस ऐश्वर्या राय हाफ अँड हा पॅटर्न असणारी काळ्या रंगाची साडी परिधान केली. जी साडी खूपच लाईट वेट होती आणि पारदर्शक होती. तिचे ब्लाऊज सुद्धा टच अँड ब्लिंग पद्धतीचे होते.

ही साडी ऐश्वर्याने एका महागड्या डिझायनर कडून खरेदी केली होती. या इव्हेंटसाठी ऐश्वर्या बच्चन हिने जे लूकिंग केले होते ते अतिशय जबरदस्त होते. टिशू फॅब्रिक्स चा वापर केलेली ही साडी अतिशय जबरदस्त दिसत होती आणि पूर्ण सोहळ्यामध्ये तिची चर्चा रंगली होती. यावेळेस ऐश्वर्या ही सासरे अमिताभ बच्चन आणि अभिषेक याच्या सोबत आली होती. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे खिळल्या होत्या.

तसेच तिने कानात घातलेल्या रिंगामुळे देखील तिची चर्चा मोठ्या प्रमाणात होत होती. डोळ्याभोवती तिने काजळ देखील लावले होते. त्यामुळे ती जबरदस्त दिसत होती. ऐश्वर्या आपल्या सौंदर्याबाबत बोलताना म्हणते की, सुंदर दिसण्यासाठी मेकअप पेक्षाही जास्त महत्त्वाची पूर्ण गोष्ट असते म्हणून ती म्हणजे आत्मविश्वास. तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्ही सुंदर दिसू शकतात.

तुमचा रंग सावळा असला तरी चालेल. मात्र, तुम्ही आत्मविश्वासाने कुठल्याही गोष्टीला सामोरे गेले तर आपण आपोआपच सुंदर दिसतो. नंतर आपण कपडे कुठले घातलेले आहेत, याला काही महत्त्व नसते. तसेच व्यायाम देखील करणे गरजेचे आहे, असे देखील ती सांगते. एकूणच तिच्या या फोटोची चर्चा मोठ्या प्रमाणात आता होत आहे.