रजनीकांतच्या लेकीने दिली अशी बातमी.. खुद्द रजनीकांत देखील हैराण..

ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिच्या घटस्फोटाच्या बातमीने तिच्या चाहत्यांची निराशा केली होती. आता पुन्हा एकदा रजनीकांतची मुलगी चर्चेत आली आहे. यावेळेस हे कारण तिच्या चाहत्यांना खूश करणारं ठरत असल्याचं बोललं जात आहे.

ऐश्वर्या रजनीकांतने साऊथ इंडस्ट्रीत दिग्दर्शक आणि गायिका म्हणून स्वत:ची ओळख बनवली आहे, हे सर्वांनाच ठावूक आहे. साऊथ इंडस्ट्रीत प्रसिद्धी मिळवल्यानंतर ती आता हिंदी चित्रपटांमध्ये काहीतरी नवीन करताना दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, धनुषची एक्स वाईफ ऐश्वर्या रजनीकांत ओ साथी चल नावाचा हिंदी चित्रपट दिग्दर्शित करत आहे. सत्य घटनेवर आधारित ही प्रेमकथा असणार आहे.

याची निर्मिती मीनू अरोरा करत आहेत, मीनू यांनी एका मुलाखतीत ऐश्वर्याच्या पदार्पणाबद्दल खुलासा केला आहे. याबाबत अधिक माहिती देण्यास मात्र त्यांनी नकार दिला. ऐश्वर्यापूर्वी  रजनीकांत आणि धनुष यांनीही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता ऐश्वर्याही बॉलिवूडकडे वळली आहे. 

ऐश्वर्या पहिल्यांदाच बॉलिवूड सिनेमासाठी दिग्दर्शन करत आहे. तिने हे काम याआधी कधीच केलं नव्हतं. हा तिचा पहिलाच प्रोजेक्ट असल्याने तिच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरत आहे.

धनुषने 18 नोव्हेंबर 2004 रोजी सुपरस्टार रजनीकांत यांची मोठी मुलगी ऐश्वर्यासोबत लग्न केले. यात्रा आणि लिंगा अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत. धनुषने ऐश्वर्याचा डायरेक्शनमध्ये बनलेला पहिला चित्रपट ‘3’ मध्ये काम केले आहे. या चित्रपटातील ‘कोलावेरी डी’ हे गाणे 2011 मधील सर्वात हिट गाणे होते.

याआधी 2 ऑक्टोबरला साऊथची आणखी एक हिट जोडी सामंथा आणि नागा चैतन्य यांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. समंथा आणि नागा चैतन्य 6 ऑक्टोबर 2021 रोजी लग्नाला चार वर्षे पूर्ण करणार होते, परंतु त्यापूर्वीच ते वेगळे झाले. आता 3 महिन्यांच्या आत धनुष आणि ऐश्वर्या वेगळे झाल्याने चाहत्यांना पुन्हा धक्का बसला आहे.