मनसे नेत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा, अभिनेता अक्षय कुमारच्या बहिणनं केली तक्रार दाखल

मनसेचे विभागप्रमुख गणेश चुक्कल (MNS leader Ganesh Chukkal) यांच्याविरुद्ध पवई पोलीस ठाण्यात खोटी सही केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरंतर, त्याच्यावर अभिनेता अक्षय कुमारची (Akshay Kumar) बहीण अलका हिरानंदानीची (Alka Heeranandani) खोटी सही केल्याचा आरोप आहे.

अलका यांच्या कंपनीच्या वतीने गणेश चुक्कल यांना 3 वर्षांसाठी फ्लॅट भाड्याने दिला होता. मात्र चुक्कल यांनी खोटे कागदपत्र तयार करून फ्लॅट 30 वर्षांसाठी भाड्याने घेतल्याचं दाखवलं.

गणेश चुक्कल यांच्या विरोधात तक्रार दाखल करत त्यांच्यावर 3 कोटींहून अधिक भाडे थकीत असल्याचे सांगण्यात येत आहे. अक्षयच्या बहिणीच्या कंपनीनं विक्रोळीतील मनसे नेते गणेश चुक्कल यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पवई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.