आलिया पेक्षाही हॉट आहे तिची वहिनी, महेश भट्ट मुळेच सोडले बॉलिवूड…

‘बॉलिवूड’ हे एक असं क्षेत्र आहे ज्यात कलाकारांची कमतरता कधीच जाणवणार नाही. दररोज लाखो तरुण-तरुणी अनेक स्वप्न उराशी बाळगून या इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करतात. काही अशेही कलाकार असतात जे चुकून म्हणा किंवा नशिबाने, या इंडस्ट्रीमध्ये येतात पण इतके सफल होत नाहीत. पण तरीही लोकांच्या आठवणीत कायम राहतात.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अभिनेत्री उदिता गोस्वामी बद्दल. कदाचित अनेकांना ही अभिनेत्रीनावानं माहित नसेल पण तुम्ही तिला तिच्या चित्रपटांच्या नावाने नक्कीच ओळखाल. 2003 साली ‘पाप’ या चित्रपटाद्वारे उदिताने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटात ती अभिनेता जॉन अब्राहमच्या विरुद्ध दिसली होती.

आपल्या पहिल्या चित्रपटात तिने बरेच बोल्ड सीन दिले होते ज्यामुळे ती चर्चेत आली. त्यानंतर 2005 साली आलेल्या ‘झहर’ या चित्रपटातुन उदिताने सर्वाधिक ओळख मिळविली. या चित्रपटात उदिता इमरान हाश्मी सोबत दिसली होती. याशिवाय अभिनेत्री शमिता शेट्टीने देखील या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातही उदिता अतिशय बोल्ड शैलीत दिसली होती.

या चित्रपटाचे दिग्दर्शन तिचे पती मोहित सुरी यांनी केले होते. या चित्रपटा नंतर उदिताने अनेकदा ‘दिल दे दिया’, ‘अगर’ आणि ‘डायरी ऑफ द बटरफ्लाय’ सारख्या बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले पण यशस्वी झाले नाही. जरी उदिताची बॉलिवूडमध्ये प्रवेश सोयीस्कर होता पण तिला फारसे यश मिळू शकले नाही.

या चित्रपटांनंतर उदिताचे चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता मोहित सूरी यांच्याशी प्रेमसंबंध जुळले. झहर चित्रपटादरम्यान दोघांत मैत्री झाली. नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी लग्न केले. मोहित सूरीची आई हिना सूरी चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांची बहीण आहे. म्हणजेच महेश भट्ट हे नात्यातील मोहितचे मामा आहेत. अभिनेत्री आलिया भट्ट आणि पूजा भट्ट या नात्याने मोहितच्या बहिणी लागतात.

अनेक चित्रपट सलग फ्लॉप गेल्यानंतर मात्र उदिताने बॉलिवूड मधून ब्रेक घेतला. नुकत्याच एक मुलाखतीत उडिताने खुलासा केला की नात्याने सासरे लागणारे महेश भट्ट हे तिने पुन्हा चित्रपट सुरू करावे यासाठी जबरदस्ती करतात. पण तिने सध्या तिच्या परिवाराकडे लक्ष देण्याचं ठरवलं आहे. आणि तिचा बॉलिवूड कडे वळण्याचा सध्या तरी काही विचार नाहीये.

तसेच उदिताच्या पहिल्या चित्रपटाच्या दिग्दर्शिका पूजा भट्ट या होत्या. लग्नाआधी ते 9 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. मोहित सोबत लग्नानंतर 2015 मध्ये या जोडप्याला एक गोंडस मुलगी झाली. लग्नाआधी ते 9 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यांना ‘देवी’ नावाची एक मुलगी आहे.

2018 मध्ये उदिता पुन्हा आई झाली आणि यावेळी त्यांना एक मुलगा झाला. उदिताने आपल्या प्रेग्नन्सीची बातमी मीडियापासून दूर ठेवली होती आणि मुलाच्या जन्मानंतरच त्यांनी ही बाब निदर्शनास आणली. उदिताचे इंस्टाग्रामवर 75 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत परंतु ती स्वत: फक्त आपल्या पतीलाच फॉलो करते.

उदिता गोस्वामी यांनी मॉडेल म्हणून करिअरची सुरूवात केली, तर मॉडेलिंग करताना तिने मॉडेल एंडोर्सर म्हणून बर्‍याच जाहिरातीही केल्या. चित्रपटात दिसण्यापूर्वी ती कोरिओग्राफर अहमद खानच्या व्हिडिओ गाण्या क्या क्या खूब लगती हो मध्ये देखील दिसली होती.

या अभिनेत्रीने काही काळापूर्वीच आपल्या मुलाचे नाव उघड केले. कौटुंबिक फोटो शेअर करताना त्याने आपल्या मुलाचे नाव ‘कर्मा’ ठेवले आहे असं जाहीर केले.