बॉलीवूडच्या ‘या’ घाणेरड्या सत्यामुळे अमिताभ ने आपल्या मुलीला नाही येऊ दिले बॉलिवूड मध्ये.. नाहीतर आज असती बॉलिवूडची टॉप अभिनेत्री..

अभिनय क्षेत्रात मग सिनेमा असो, वा नाटक किंवा टीव्ही सीरिअल्स रोजच हजारो लोक या चंदेरी दुनियेत सुपरस्टार बनण्याचं स्वप्न घेऊन येत असतात.. मग ते तरुण-तरुणी असोत, किंवा मग वयोवृद्ध कलाकार.. यातल्या अनेकांना आपल्या कलेच्या जोरावर म्हणा किंवा मग वशील्याचा जोरावर, मनासारखं काम मिळून जातं. पण असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचात प्रतिभा असूनही चांगले रोल मिळत नाही.

बॉलिवूड मध्ये सध्या नेपोटीझम चा मुद्दा चर्चेत आहे. बॉलीवूड मध्ये असे अनेक दिग्गज अभिनेते किंवा अभिनेत्र्यांची मुले आहेत जे फक्त आणि फक्त आपल्या आईवडिलांच्या वशील्यावर बॉलिवूड मध्ये काम मिळवत आहेत असे अनेकांना वाटत आहे. पण त्याच बरोबर असेही काही स्टार कीड आहेत ज्यांनी बॉलिवूड पासून स्वतःहुनच दूर राहण्याचा निर्णय घेतला.

बॉलिवूडचा महान नायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन आपल्या कुटुंबामुळे देखील चर्चेत असतात. बच्चन कुटुंब आदर्श कुटुंबापैकी एक आहे हे सर्वांना माहीतच आहे. त्यांची मुलगी श्वेता बच्चन-नंदा, जी अमिताभ यांच्या विशेष जवळ आहे. ती कायम प्रसिद्धीपासून दूर राहिली आहे, पण तिची स्वतःची अशी देखील एक ओळख आहे.

नुकताच श्वेताने तिचा 47वा वाढदिवस साजरा केला आहे. परंतु 47 वर्षाची असूनही श्वेताने स्वतःला अतिशय तरुण ठेवलं आहे. आणि विशेष काळजी घेतली आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला तिच्याशी संबंधित असे काही खास किस्से सांगणार आहोत, ज्यामध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीमधून तिने का काढता पाय घेतला, हे समजेल.

श्वेता बच्चन नंदाचा जन्म भारतात झाला होता. परंतु, नंतर ती उच्च शिक्षणासाठी स्वित्झर्लंडमध्ये गेली. तिथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर श्वेता पुन्हा भारतात परतली. भारतात आल्यावर पत्रकार म्हणून तिने कामही केले. ती एका प्रसिद्ध वाहिनीसाठी काम करायची. आणि त्यामुळेच तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

श्वेताला सुरुवातीपासूनच चर्चेत येण्याची आवड नव्हती. म्हणूनच तिला बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर रहायचे होते. पण, तिला फॅशनची खूप आवड होती. म्हणून तिने 2006मध्ये मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली. तिने L’ Officiel Indiaसाठी काम केले. तिने हे क्षेत्र स्वतःच्या आवडीने निवडलं होतं.

श्वेता ला लहानपणी पासूनच शिक्षणाची आवड होती. तिने शिकून खूप मोठं व्हावं असं तिला लहानपणी पासूनच वाटत होतं. त्यामुळेच अमिताभ आणि जया बच्चन यांनी तिला बॉलिवूड मध्ये न आणण्याचा निर्णय घेतला. कारण बॉलिवूड मध्ये आल्यावर शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं हे सर्वश्रुत आहे.

श्वेताला लिहिण्याची देखील आवड आहे, म्हणूनच तिने तिच्या एका कॉलममध्ये इंडस्ट्रीपासून दूर राहण्याचे कारण उघड केले होते. यात तिने आपल्या बालपणातील एका घटनेचा उल्लेख केला होता. तिने सांगितले की, ती लहान असताना तिच्या पालकांचे वेळापत्रक खूप व्यस्त होते. दोघेही कलाकार असल्याने त्यांना शिफ्टमध्ये काम करावे लागायचे. अशा परिस्थितीत ती अनेकदा तिच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी त्यांच्या सेटवर जायची.

एक दिवस ती वडील अमिताभ बच्चन यांच्या मेकअप रूममध्ये खेळत होती. त्यावेळी तिचे बोट एका खुल्या सॉकेटमध्ये अडकले. या घटनेमुळे तिच्या मनात खूप भीती निर्माण झाली. तेव्हापासून तिने सेटवर जाणे थांबवले आहे. तिने मोठ्या गमतीने सांगितले की, कदाचित हे देखील एक कारण आहे की तिला मनोरंजन विश्वात पाऊल ठेवण्याची हिम्मतच झाली नाही.

श्वेताने एका मुलाखतीत सांगितले होते की, पूर्वी तिला वाटायचं की गाणं गाणे आणि अभिनय करणे खूप सोपे आहे. पण शाळेच्या काळात जेव्हा तिला नाटकात अभिनय करायला मिळाला, तेव्हा तिला कळलं की ते किती कठीण आहे. खरं तर, ती एका नाटकात एक हवाईयन मुलगी बनली, यासाठी तिने कठोर रिहर्सल देखील केली होती. असे असूनही, शेवटच्या क्षणी ती आपले संवाद विसरली. ज्यामुळे तो सीन खराब झाला. तो तिच्यासाठी खूप वाईट अनुभव होता.