अभिनय क्षेत्रात मग सिनेमा असो, वा नाटक किंवा टीव्ही सीरिअल्स रोजच हजारो लोक या चंदेरी दुनियेत सुपरस्टार बनण्याचं स्वप्न घेऊन येत असतात.. मग ते तरुण-तरुणी असोत, वयोवृद्ध कलाकार किंवा मग बाल-कलाकार.. गेल्या काही वर्षांत कलाकारांच्या अनेक भूमिका अजरामर झाल्या आहेत.
पण काळाच्या ओघात आपण त्या कलाकारांना विसरून गेलो आहोत. पण काही कलाकार असे होते ज्यांनी आपली वाटचाल पुढे सुरू ठेवली. आज आपण जाणून घेणार आहोत शा एका अभिनेत्री बद्दल जिने बॉलिवूड मध्ये पदार्पण तर धमाकेदार केलं, पण तेव्हा रातोरात स्टार होऊन सुद्धा आज मात्र ती स्वतःची ओळख हरवून बसली आहे.
आशिकी सिनेमामुळे रातोरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे रुबीना कुरेशी. एका सिनेमामुळे अन्नू देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झाली. यशाच्या शिखरावर असतानाच १९९९ मध्ये तिच्या गाडीला एक अ-पघा-त झाला. हा अ-पघा-त इतका भीषण होता की, ती जवळजवळ एक महिना ती कोमात होती.
11 जानेवारी 1969 मध्ये दिल्लीत अनू अग्रवालचा जन्म झाला होता.1990 साली महेश भट यांनी ‘आशिकी’ सिनेमात अनूला पहिला ब्रेक दिला होता. या सिनेमामुळे अनू एका रात्रीत स्टार झाली होती. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता.
वयाच्या केवळ 21 व्या वर्षी अनू आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि भोळ्याभाबड्या चेह-यामुळे उत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली. मात्र अल्पावधीतच तिच्या स्टारडमचा ग्राफ खाली येऊ लागला. ‘आशिकी’नंतर अनूचे ‘गजब तमाशा’, ‘खलनायिका’, ‘किंग अंकल’, ‘कन्यादान’ आणि ‘रिटर्न टू ज्वेल थील’ हे सिनेमे कधी आले आणि कधी गेले, हे कुणाला कळलेसुद्धा नाही.
हिंदी सिनेमात मिळालेल्या अपयशानंतर अनू तामिळ सिनेमांकडे वळली. ‘थिरुदा-थिरुदा’ या तामिळ सिनेमात ती झळकली होती. मणिकौल यांच्या ‘द क्लाऊड डोर’ या शॉर्ट फिल्ममध्ये अनूने चक्क न्यू-ड सीन देऊन प्रसिद्धी मिळवली होती. मात्र 1996 सालानंतर तिने अभिनयाला रामराम ठोकला. 1997 सालापासून ती योगा ट्रेनर झाली. मात्र काही प्रेमसं-बंध आणि व्य-स-नांमुळे ती काही काळ चर्चेत राहिली. पण अल्पावधीतच सिनेमे आणि गॉसिप्सपासून ती दूर झाली.
कोमातून बाहेर आल्यावरही अनेक महिने तिला उपचारांसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ठेवण्यात आले होते. त्यामुळे तिचा चेहरा पूर्णपणे बदलला. या अपघातानंतर अन्नू संपूर्णपणे बॉलिवूडपासून दूर गेली. तिने कधीच कोणत्या सिनेमात काम केले नाही.…छोट्याशा फिल्मी करिअरमध्ये अन्नूने यशोशिखर गाठले होते.
सध्या अन्नू अग्रवाल फिल्मी दुनियेपासून अज्ञातवासात आयुष्य व्यतित करत आहे. अलीकडेच कपिल शर्मा शोमध्ये आशीकी टीमसह तिने हजेरी लावली होती. तिला बघून ही एकेकाळची नावाजलेली अभिनेत्री अन्नू अग्रवाल आहे, हे ओळखणं कठीण झालं होतं.
राहूल रॉय व अन्नू अगरवाल या नवोदीत जोडीच्या आशिकीने इतिहास घडवल्यानंतर आशिकी २ मध्ये श्रद्धा कपूर व आदित्य रॉय कपूर झळकले होते. मात्र, आशिकी ३ मध्ये नव्या चेह-यांना संधी न देता फेमस चेहरे घेण्याचं निर्मात्यांनी निश्चित केल्याचं वृत्त एका फिलमी मॅगेझिनने दिलं आहे.

.