अनन्या पांडेच दुःख पडलं बाहेर, माझ्या छोट्या बु.. मुळे खूप संकट आली, लोक मला सांगायची वाढ कर…

चंकी पांडे आणि भावना पांडे यांची मुलगी अनन्या पांडे इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. अनन्या चित्रपटांमधील भूमिकांपेक्षा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अनेकदा ती अशा काही गोष्टी बोलते ज्यामुळे तिला ट्रोलिंगला बळी पडावे लागते.

अनन्याची जीवनशैली पाहून असे वाटते की तिच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नाही. चांगल्या कुटुंबासोबतच तिच्याकडे रोल्स पण चांगले आहेत. हळुहळू योग्य अभिनयाने ती एक दिवस इंडस्ट्रीत स्वतःचे नाव मोठे करेल.

मात्र, अनन्याने एका शोमध्ये असे काही खुलासे सुद्धा केले आहेत, ज्यावरून कळते की तिला लोकांच्या किती वाईट गोष्टींना सामोरे जावे लागले आहे. अनन्या पांडे अनेकदा टीकेची शिकार होते, पण ती या गोष्टी मनावर घेत नाही. मात्र, काही गोष्टी अशा असतात की ज्या ठरवूनही विसरता येत नाहीत. अशाच काही गोष्टी अनन्या पांडेलाही बोलल्या गेल्या होत्या, ज्या आठवून अनन्या खूप दुःखी होते.

अनन्या पांडेची वेदना आली समोर


नुकतीच अनन्या पांडे रणवीर सिंगच्या शोमध्ये पोहोचली होती. या शोमध्ये तिने सांगितले की तिला तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात लैंगिक भेदभावाचा सामना करावा लागला आहे. हे प्रकरण एवढ्यापर्यंत पोहोचले होते की, अभिनेत्रीला स्तन वाढवून घेण्यास सांगण्यात आले होते. अनन्या पांडे म्हणाली, ‘लोकांनी मला चेहरा, शरीर, अगदी बुब जॉब घेण्याचा सल्ला दिला जो माझ्यासाठी खूप वेदनादायक होता.

अनन्या पुढे म्हणाली की, जेव्हा मी कामाला सुरुवात केली तेव्हा लोकांच्या तोंडून या अशा गोष्टी बाहेर पडल्या. या गोष्टी त्यांनी अगदी बेतालपणे व सहजपणे सांगितल्या. अनन्या पांडे म्हणाली, ‘मला कधीच कोणी थेट काही बोलले नाही पण मला सर्व काही समजायचे. ते म्हणायचे शरीर थोडे भरवा, वजन वाढवायला हवे.

जेव्हा कोणी तुमच्या शरीराला जज करतो ती सर्वात वाईट गोष्ट असते. याआधीही अनन्या पांडेने या गोष्टींचा खुलासा केला होता की तिच्या बॉडीबद्दल विचित्र कमेंट करण्यात आल्या होत्या. अनेकवेळा तिला फ्लैट चेस्टेड असेही संबोधले गेले, जे ऐकणे खूप कठीण होते.

अनन्या या चित्रपटातून धमाल करणार आहे

विशेष म्हणजे, अनन्या तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत राहत आली आहे. एका शोमध्ये अनन्या म्हणाली होती की, स्टार किड्सचे आयुष्यही संघर्षमय असते. तेव्हा या वक्तव्यावरून बराच गदारोळ झाला होता. अनन्याला खूप ट्रोल करण्यात आले कारण एक स्टार किड असल्याने तिला जितक्या सहजपणे भूमिका मिळाल्या, तितक्या सहजतेने लोकांना भूमिका मिळत नाहीत. याशिवायही अनन्या तिच्या वक्तव्यामुळे अनेकदा ट्रोल्सची शिकार झाली आहे.

तिच्या करिअरबद्दल सांगायचे तर, अनन्याने करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर 2 मधून इंडस्ट्रीत पदार्पण केले. या चित्रपटात ती टायगर श्रॉफसोबत दिसली होती. अनन्याने सांगितले की, मला कोणती भूमिका मिळेल असे कोणतेही आश्वासन दिले नव्हते. मला नेहमीच चित्रपटात काम करायचे होते पण मी अभिनेत्री कशी होणार हे मला माहीत नव्हते.

या चित्रपटानंतर अनन्या ईशान खट्टरसोबत खाली पीलीमध्ये दिसली होती. अनन्या लवकरच लायगर या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत साऊथ स्टार विजय देवरकोंडा आहे.