मालायकाच्या मुलानं सर्वांसमोर उडवली तिच्या ड्रेसिंग सेन्सची खिल्ली म्हणाला, जास्त *** दाखवत नको

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही सध्या ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ या शोमध्ये दिसत आहे. या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना मलायकाचे खासगी आयुष्य कसे आहे हे पाहायला मिळत आहे. दरम्यान, शोमध्ये मलायकाचे जवळचे व्यक्ती दिसत आहेत. त्यापैकी एक म्हणजे तिचा मुलगा अरहान… हटके फॅशनमुळे ओळखली जाणाऱ्या मलायकाचं ड्रेसिंग सेन्स तिच्या मुलाला आवडत नाही.

यावेळी अरहानने मलायकाच्या स्टायलिश आऊटफिटची तुलना ही तुरुंगातील कैदींशी केली आहे. ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ या शोच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये अभिनेत्रीनं अतिशय सुंदर टॉप परिधान केला होता. मलायकाला पाहताच अरहाननं तिची मस्करी करत म्हणाला, ‘तू आता जेलमध्ये असलेल्या कैदींसारखी दिसते. मुलाच्या या वक्तव्यावर मलायकानं काही रिअॅक्ट केलं नाही आणि ती हसू लागली.’

अरहाननं शोमध्ये खुलासा केला की त्याचे मावशी अमृता अरोरासोबत चांगले संबंध आहेत. अरहाननं अमृताला त्याची दुसरी आई म्हटलं आहे. अरहान म्हणाला की, मी अमूसाठी थोडा बायस्ड आहे. तुझ्या पोजिशनला येण्यासाठी ती खूप प्रयत्न करत आहे. ती माझ्या दुसऱ्या आईसारखी आहे, पण मला आता असं वाटतं की ती पहिल्या पोजिशनवर येते.

या शोमध्ये अरहान आणि अमृतामध्ये असलेली बॉंडिग दिसून येत आहे. ते एकत्र चांगलीच धमाल करत आहेत. अरहान हा अरबाज खान आणि मलायकाचा मुलगा आहे. अरहान हा अमेरिकेत फिल्म मेकिंगचे शिक्षण घेत आहे. सध्या तो भारतात आला आहे. अरबाज आणि मलायका 1998 साली लग्न बंधनात अडकले होते. लग्नाच्या 19 वर्षानंतर 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

घटस्फोटानंतरही मलायका आणि अरबाज अनेकदा त्यांच्या मुलासोबत स्पॉट झाले आहेत. मलायकानं घटस्फोटाच्या वेळी अरबाजकडून 15 कोटी रुपये पोटगी घेतली होती. दरम्यान, मलायका सध्या ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या शोमध्ये दिसत आहे. सगळ्यांपासून पर्सनल लाइफ लपवून ठेवणारी मलायका तिचं संपूर्ण आयुष्य चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे. मलायका अरोराच्या या शोचे अनेक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.