या मराठी कलाकाराच्या लेकीचा थाटामाटात पार पडला साखरपुडा… पहा फोटोज..

सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हस्यजत्रा मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या अरुण कदम यांच्या लेकीचा साखरपुडा नुकताच थाटामाटात पार पडला आहे. अरुण कदम यांची एकुलती एक कन्या सुकन्या कदम हिचा साखरपुडा सागर पोवळे याच्यासोबत संपन्न झाला आहे.

सुकन्याने आपल्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून ही आनंदाची बातमी सांगितली आहे. थाटात पार पडलेल्या तिच्या साखरपुड्याला अरुण कदम यांच्या सहकलाकारांनी हजेरी लावली होती त्यात जयवंत वाडकर आणि सुप्रिया पाठारे या देखील सहभागी झालेल्या पाहायला मिळाल्या.

अरुण कदम यांची लेक सुकन्या ग्राफिक डिझायनर आहे . नृत्याची तिला विशेष आवड असून भरतनाट्यमचे प्रशिक्षण तिने घेतले आहे. सुकन्या लवकरच सागर पोवळे सोबत विवाहबंधनात अडकणार आहे अशी माहिती तिची आई वैशाली कदम यांनी इंस्टाग्रामवरून दिली आहे.

अरुण कदम यांचा होणारा जावई हा बिअर क्षेत्रात कार्यरत असून हेड ब्रिवर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. अरुण कदम यांनी अनेक कॉमेडी शो मधून प्रेक्षकांना हसवण्याचे काम केले आहे. कॉमेडीची बुलेट ट्रेन असो वा चित्रपट अनेकदा त्यांच्या वाट्याला विनोदी भूमिकाच आलेल्या पहायला मिळतात.

केवळ मराठी चित्रपट नाही तर त्यांनी काही बॉलिवूड चित्रपट देखील साकारले आहेत. त्यांच्या विनोदी अभिनयाने त्यांनी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले पाहायला मिळते. महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची बुलेट ट्रेन या शो मधून पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी सोबतची त्यांची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली.

त्याचमुळे ही जोडी आजही प्रेक्षकांना हास्य जत्रेमधून मनमुराद हसवण्यास सज्ज असते. या शोमध्ये अनेक नवे कलाकार आले मात्र या दोघांची जोडी आजही अबाधित राहिली आहे. अरुण कदम यांच्या लेकीला सुकन्या कदम हिला तिच्या साखरपुड्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा…