बॉलिवूडच्या या प्रसिद्ध खलनायकाची पत्नी आहे ही सुंदर अभिनेत्री.. फोटोज पाहून व्हाल थक्क..

खरंतर आपल्या भारतीय हिंदी चित्रपटांत नायकाचं पात्र खूप महत्वाचं असतं. परंतु नायकांसोबतच खलनायक देखील तितकेच महत्त्वाचे असतात ही गोष्ट सर्वच सिनेरसिकांना माहीत आहे. खलनायक नसेल तर प्रत्येक चित्रपट अपूर्ण वाटतो. जसं दु:खाशिवाय आनंदालाही काही किंमत नसते तशाच प्रकारे, चित्रपटात खलनायक नसल्यास चित्रपटात हिरोला किंमत येऊ शकत नाही.

आज आपण ज्या खलनायकाबद्दल बोलणार आहोत, ज्याने आपल्या अदाकारीने चित्रपटां मध्ये अनेक नायकांना घाम फोडला आहे. आम्ही आपल्या चित्रपटांतील सर्वात खुंखार खलनायक आशिष विद्यार्थी यांच्याबद्दल बोलत आहोत. ज्यांना चित्रपटांमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जास्त ओळखले जाते.

तुमच्या माहितीसाठी आशिष विद्यार्थी यांनी बिच्छू, क्या यही प्यार है, टपोरी वांटेड इत्यादी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय फारच कमी चित्रपट असे असतील, ज्यात आशिषने खलनायकाची भूमिका केलेली नसावी. यामुळेच लोकांना आता त्याला खलनायक म्हणून बघायची सवय आहे.

परंतु खऱ्या आयुष्यात मात्र आशीष हे अद्भुत व्यक्ती आहेत आणि ते आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आशिष मोठ्या पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारत असले, तरी दुसरीकडे त्याची पत्नी देखील एक अभिनेत्री आहे. त्यांच्या पत्नीचे नाव राजोशी आहे. राजोशी विद्यार्थी या फक्त दिसायला सुंदर नसून एक उत्तम अभिनेत्री देखील आहेत.

आशिष विद्यार्थी यांची पत्नी राजोशी विद्यार्थी यांनी बर्‍याच टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे आशिष आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतात आणि दोघांनाही बर्‍याच ठिकाणी सोबत पाहिले गेले आहे. आशिष यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासाठी सर्वस्व आहेत. आणि त्यांचं सर्वात मोठं पाठबळ त्यांची पत्नी राजोशी याच आहेत.

राजोशी यांनी आपल्या टीव्ही सिरिअल मधील करिअरची सुरुवात ‘सुहानी सी एक लडकी’ या मालिकेतून केली. या मालिकेनंतर त्या ‘सती’, ‘डायमंड रिंग’, तसेच ‘गुरुदक्षिणा’ या चित्रपटात देखील दिसल्या. परंतु नंतर मात्र त्यांना हव्या तशा भूमिका मिळाल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी फक्त टीव्ही सिरिअल्स वरच आपलं लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.

आशिष विद्यार्थी बद्दल बोलायचे झाले तर त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. बॉलिवूड चित्रपटांसोबतच त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी केली. सध्याच्या काळात ते चित्रपटांमध्ये दिसत नसले तरी एकेकाळी त्यांना निगेटिव्ह रोल साठी खूप मागणी होती.

आशिष यांनी चित्रपटात जरी खलनायकाचा रोल केला असला तरी खऱ्या आयुष्यात मात्र ते मनाने खूप चांगले आणि निर्मळ व्यक्ती आहेत. त्यांच्या याच स्वभावामुळे राजोशी सुंदर असूनही त्यांच्या प्रेमात पडल्या. आणि नंतर दोघे विवाहबंधनात अडकले. आपण येथे त्याच्या सुंदर जोडप्याचे काही निवडक छायाचित्रे पाहू शकता.

आम्हाला खात्री आहे की त्यांच्या जोडप्याचे छायाचित्रे पाहिल्यानंतर आपण त्यांच्या सौंदर्याचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. खरं तर आशिषची पत्नी इतकी सुंदर आहे की आशिष देखील कायम स्तुती करत राहतात. आशिष विद्यार्थी यांची पत्नी चित्रपटात फारच क्वचित दिसली आहे आणि टीव्ही मालिकांमध्ये ती अधिक दिसते. अशा परिस्थितीत प्रेक्षकही त्याच्या टीव्हीवर परत येण्याची वाट पाहत आहेत.