20 वर्षांपूर्वीच बॉलिवूड सोडून आता साध्वी झाली आहे ही मराठमोळी अभिनेत्री.. ड्र-ग माफियासोबत होते संबंध..

‘आशिक आवारा’, ‘करण-अर्जुन’ सारख्या चित्रपटात काम करून चर्चा एकवटणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी 49 वर्षांची झाली आहे. ममताचा जन्म 20 एप्रिल 1972 रोजी मुंबईतील एका मराठी कुटुंबात झाला होता. 90 च्या दशकात बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये से- क्स सिम्बॉल म्हणून ओळख निर्माण करणारी ममता आता साध्वी झाली आहे. गेल्या दोन दशकांपासून लाइमलाइटपासून दूर असलेल्या ममताने आता अध्यात्माचा मार्ग निवडला आहे. 2013 मध्ये तिचे एक पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

ड्र- ग माफियाशी थाटले लग्न

मीडिया रिपोर्टनुसार, ममता कुलकर्णीने दुबईत राहणा-या विकी गोस्वामी या अंड-र वर्ल्ड ड्र- ग माफि- याशी लग्न केले आहे. मात्र, ममताने नेहमीच तिच्या लग्नाच्या बातम्यांचे खंडन केले आहे. ममताने सांगितले, “मी कधीच कुणाबरोबर लग्न केलेले नाही. हे खरं आहे की माझे विकीवर प्रेम होते, पण त्यालादेखील हे समजेल आहे की, आता माझं पहिलं प्रेम ईश्वर आहे,” असे ममता म्हणाली होती.

आता बनली साध्वी

एकेकाळी आपल्या ग्लॅमरस आणि बो- ल्ड अदांनी चर्चा एकवटणारी ममता कुलकर्णी आता साध्वी बनली आहे. बॉलिवूडला रामराम ठोकून आता तिने अध्यात्माच्या मार्ग निवडला आहे. 2013 मध्ये तिचे ‘ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगिनी’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. यावेळी ममता कुलकर्णी म्हणाली होती, ‘काही लोक जगाच्या कार्यासाठी जन्माला येतात, तर काही भगवंतासाठी. माझा जन्मसुद्धा देवासाठी झाला आहे.’

तामिळ चित्रपटाद्वारे केली होती करिअरची सुरुवात

1991 मध्ये ममताने आपल्या करिअरची सुरुवात ‘ननबरगल’ या तामिळ चित्रपटद्वारे केली होती. 1992 मध्ये ‘तिरंगा’ चित्रपटाद्वारे तिने बी-टाऊनमध्ये पदार्पण केले. 1993 च्या ‘आशिक आवारा’ या चित्रपटाने ममताला स्टारपद बहाल केले होते. या चित्रपटासाठी तिला ‘फिल्मफेअर न्यू फेस’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर ती ‘वक्त हमारा है’, ‘क्रांतिवीर’, ‘करण अर्जुन’, ‘बाजी’ या चित्रपटांमध्ये झळकली. 2002 मध्ये आलेला ‘कभी तुम कभी हम’ हा तिचा शेवटचा चित्रपट आहे.