‘सनम बेवफा’ मधून रातोरात प्रसिद्ध झालेली सलमानची ही अभिनेत्री आता दिसते कमाल.. अनेक वर्षांनंतर आली नजरेत..

फिल्मी जगतात अश्या अनेक अभिनेत्र्या आल्या आणि बक्कळ नाव व पैसा करून भरपूर पुढे गेल्या. आपल्याला ही गोष्ट माहित असेलच की या मोठ्या इंडस्ट्री मध्ये नाव कमावणे इतके सोपे नाहीये. ओरन्तु आपल्या अदाकारीच्या जोरावर अनेक कलाकारांनी आपली छाप सोडली.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी एकेकाळी खूप सुप्रसिद्ध राहिली आहे. या अभिनेत्रीने बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता भाईजान सलमान खानसोबत उत्तम अभिनय केला होता, ज्याची लोकांनी खूपच स्तुती केली होती .

खरंतर अनेक अभिनत्र्यांनी सल्लू भाईच्या जोडीने काम केलं आहे, परंतु या अभिनेत्रीला अद्याप लोक विसरू शकले नाही आहेत.. कदाचित आपल्याला ही आश्चर्य कारक गोष्ट माहित नसेल की सलमान खानने ज्या ज्या नवीन अभिनेत्रींसोबत काम केले होते त्या सर्व नवीन अभिनेत्री आज बॉलिवूड मधून गायब झाल्या आहेत.

आज आपण ज्या अभिनेत्री बद्दल बोलणार आहोत तिने बॉलिवूड स्टार सलमान खानच्या विरुद्ध चित्रपट बेवफा सनममध्ये काम केले आहे. या सुंदरीचा हा चित्रपट चांगलाच गाजला होता, त्यानंतर तिचे करिअर सातव्या आस्मानात होते. या एका चित्रपटाच्या जोरावर ती रातोरात स्टार झाली.. आणि अनेक तरुणांच्या दिलाची धडकन झाली.

होय, आम्ही बोलत आहोत 90 च्या दशकातील अभिनेत्रीबद्दल जी ‘सनम बेवफा’ चित्रपटामुळे प्रसिद्ध झाली. तिचे नाव ‘नवोदिता शर्मा’ ऊर्फ चांदनी असे तिचे नाव आहे. नवोदिता ने आपल्या कारकिर्दीची सुरुवात सलमान खानसोबतच सनम बेवफा चित्रपटातून केली आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. या जोडीचा सर्वत्र बोलबाला झाला..

पहिल्याच चित्रपटात मिळालेल्या यशामुळे असे वाटले होते की नवोदिता बॉलिवूडमध्ये बराच काळ राहील. पण असं काही घडलं नाही. हा चित्रपट नक्कीच एक मोठा हिट सिनेमा ठरला होता, पण त्यात काम करणारी चांदणी हिट होऊ शकली नाही. त्याचबरोबर तिला या चित्रपटाकडून ओळख मिळाली पण ती ती जास्त काळ टिकवून ठेवू शकली नाही. दुसरीकडे, सलमान खान आज एक मोठा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो.

नवोदिताने तिच्या कारकीर्दीत सुमारे 10 चित्रपटांत काम केले आणि जवळपास 5 वर्षे काम केले पण त्यानंतर तिने आपल्या बॉलिवूड ला निरोप दिला. त्यानंतर तिने आपले लक्ष वेगळ्या क्षेत्रात वळवत ती कायमची अमेरिकेत स्थायिक झाली. त्यांचा शेवटचा चित्रपट 1996 मध्ये आलेला ‘हाहाकार’ होता, त्यानंतर चांदनी चित्रपटांमधून अज्ञात झाली.

आपणांस हे जाणून आश्चर्य वाटेल की नवोदिता आता चित्रपटांपासून दूर असली तरी आता ती आंतरराष्ट्रीय नर्तक आहे. बॉलिवूड सोडल्यानंतर ती परदेशात गेली आणि लग्न करुन तिथेच स्थायिक झाली. ती आता एक नृत्य शिक्षिका झाली आहे आणि विदेशातील मुलींना शास्त्रीय नृत्य शिकवते.

यासोबतच चांदनी तिच्या कुटुंबाचीही पूर्ण काळजी घेते. त्यांना करिश्मा आणि करीना अशी दोन मुलीही आहेत. आता ती एक सामान्य जीवन व्यतीत करत आहे आणि पुन्हा चित्रपटात येण्याचा सध्यातरी तिचा काहीच इरादा नाहीये.