या एका घटनेमुळे आजवर ‘गरोदर’ नाही राहिली ही सुप्रसिद्ध अभिनेत्री.. आता वाटतेय खंत पण..

छोट्या पडद्यावरील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या गरोदरपणात आलेल्या अडचणींवर खुलासा केला आहे. जाणून घेऊया त्याबद्दल…

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी हे टीव्हीच्या प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. हे जोडपं लवकरच आईबाबा बनणार आहे. देबिना आणि गुरमीतने २०११ मध्ये लग्न केलं होतं. परंतु लग्नाच्या तब्बल ११ वर्षांनंतर अभिनेत्री आता प्रेग्नेंट आहे.

नुकतंच झालेल्या खुलास्यानुसार, देबिना आजारपणामुळे ११ वर्षांत आई होऊ शकली नाही. ही बातमी तुम्हालाही जागृत करणारी आहे. काळजीपूर्वक वाचा. अनेकदा ज्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. त्याच गोष्टी मोठी समस्या निर्माण करतात.

देबिनाच्या म्हणण्यानुसार, एका आजारामुळे तिला आई होण्यासाठी इतका वेळ वाट पाहावी लागली. अभिनेत्रीने सांगितले की, ‘जेव्हा मी डॉक्टरांकडे गेले तेव्हा मला समजले की मला एंडोमेट्रिओसिसची समस्या आहे. त्याच्या उपचारासाठी मी अॅक्युपंक्चर आणि विविध उपचारांचा अवलंब केला.

देबिनाने सांगितले की, ‘हा एक आजार आहे ज्यामध्ये गर्भाशयात रक्तस्त्राव होतो आणि गर्भधारणेमध्ये समस्या येते. यातून सुटका करण्यासाठी मी अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेदिक उपचारही घेतले. देबिना म्हणाली, ‘मला रोज सकाळी १० वाजता उपचारासाठी जावे लागे.

माझा सल्ला आहे की जेव्हा जेव्हा मासिक पाळी दरम्यान खूप वेदना होतात तेव्हा त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तिच्या वेदनांबद्दल सांगताना देबिना म्हणाली, ‘मला किशोरवयात कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता. पण गेल्या २-३ वर्षांपासून असह्य वेदना होत होत्या.

मी ही वेदना सर्वसामान्य असल्याचं गृहीत धरलं. परंतु तसं नव्हतं. देबिना म्हणाली की, आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर कोणाचीही मदत घेण्यात संकोच करू नका. सर्व समस्या तुमच्या पतीसोबत शेअर करा. कोणत्याही आजारावर वेळेवर उपचार करा.