मोक्कार ‘आयटम’ आहे भाग्यश्री ची मुलगी, मलायका प्रेक्षा मोठी आहे तिची गा…

90 च्या दशकातील अभिनेत्री भाग्यश्री चित्रपट जगताला अलविदा करून आता पुन्हा परतली आहे. भाग्यश्रीने फिल्मी दुनियेत पाऊल ठेवताच खळबळ उडवून दिली होती, लोकांमध्ये तिची क्रेझ निर्माण झाली होती. मैंने प्यार किया या चित्रपटातून सलमान खानसोबत चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या भाग्यश्रीचा निरागसपणा आणि अभिनय लोकांना खूप आवडला होता.

हा चित्रपट त्या काळातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता. इतकंच नाही तर तर या चित्रपटानंतर तिला इतर अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सच्या ऑफरही आल्या होत्या. मात्र तिने खूप कमी काळातच चित्रपट सृष्टीला अलविदा केला होता. भाग्यश्रीने ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि हाच तिचा शेवटचा चित्रपट ठरला.

या चित्रपटानंतर तिने हिमालय दसानीशी लग्न केले आणि चित्रपट जगताचा निरोप घेतला. लग्नानंतर तिने आपल्या कुटुंबातील जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडल्या आणि आता ती बॉलिवूडमधील दुसऱ्या इनिंगसाठी सज्ज असल्याचे दिसत आहे. नुकतीच बातमी आली आहे की, ती आणि तिची मुलगी लवकरच वेब सिरीजमधून पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.

भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानीने नुकतच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि तिची 26 वर्षांची मुलगी अवंतिका दासानीही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अवंतीका तिची आई भाग्यश्रीसारखीच आहे, असे म्हटले जाते. खूप सुंदर. तिच्या वेब सीरिजबद्दल सांगायचे झाले तर, अवंतिका हुमा कुरेशीसोबत मिथ्यामध्ये दिसणार आहे. ही वेबसीरिज चीट या ब्रिटीश वेब सिरीजचा रिमेक होती.

या वेब सीरिजमध्ये अवंतिकाला चांगलीच पसंती मिळाली होती. तिच्या सौंदर्याबद्दल बोलायचे झाले तर ती कोणत्याही टॉप हिरोइनपेक्षा कमी नाही. अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर अवंतिका हुमा कुरेशीला चांगली टक्कर देताना दिसली आहे. आता अवंतिका तिचं करिअर कसं पुढे नेतं हे पाहणं रंजक ठरणार आहे.