एक मुलाचा बाप झालाय तरी हा अभिनेता दुसऱ्या अभिनेत्री सोबत करतोय ‘चाळे’

कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया नुकतेच एका मुलाचे पालक बनले आहेत. मुलाच्या जन्मानंतर भारतीने कामातून ब्रेक घेतला आहे. याआधी ती हर्ष लिंबाचियासोबत हुनरबाज शो होस्ट करत होती. पण आता बाळ झाल्यानंतर ती त्याच्यासोबत जास्त वेळ घालवत आहे.

आता जरी भारती या शोमध्ये दिसत नसली तरी हर्ष हा शो होस्ट करत आहे. अलीकडेच भारतीच्या जागी सुरभी चंदनाला रिप्लेस करण्यात आलं आहे. हर्ष सुरभीसोबत खूप मस्ती करतो. दरम्यान, मिथुन चक्रवर्ती यांनी हर्ष सुरभीच्या कंबरेवर हात ठेवून फिरत असल्याने त्याचा क्लास घेतला.

खरंतर, शोचा प्रोमो व्हिडिओ आला आहे. जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हर्ष सुरभीच्या कंबरेला पकडतो आणि तिला जजेसच्या खुर्चीपर्यंत घेवून जातो. आणि तिची सर्वांशी ओळख करून देतो. तो सगळ्यात आधी सुरभीला मिथुन चक्रवर्ती यांच्याकडे घेवून जातो.

मात्र मिथुन हर्षला सांगतात की, तू आधी तिच्या कंबरेवरून हात काढ. त्यानंतर तो हात काढतो. त्यानंतर ते दोघं काही अंतरावर उभे राहतात तेव्हा हर्ष म्हणतो की दादा मी सुरभीला तुम्हाला भेटायला घेऊन आलो आहे. ‘यांवर मिथुन म्हणतात, ‘ओळखं करुन द्या पण लांबून.’

यानंतर हर्ष सुरभीची सर्वांशी ओळख करून देतो आणि म्हणतो, ‘ही आमची नवीन होस्ट आहे.’ यावर करण म्हणतो, घरातील नवीन सून असल्याप्रमाणे अभिनेत्रीची ओळख करून देत आहेस. सुरभी करणशी सहमत होते आणि म्हणते की, तिलाही समजत नाही की तो असं का करतोय, पण आजच्यासाठी त्याला सूट दिली आहे.

यानंतर करणने आपलं गायन कौशल्यही दाखवलं आणि तो ‘चांद मेरा दिल, चांदनी हो तुम’ हे गाणं गातो. जजला भेटल्यानंतर, जेव्हा होस्ट परत जाऊ लागतात तेव्हा हर्ष पुन्हा सुरभीच्या कंबरेवर हात ठेवून निघून जाऊ लागतो.