बिना मेकअप चे काही असे दिसतात बॉलिवूड स्टार्स, म्हातारे झालेत आता हे तिन्ही खान

बॉलीवूड विश्वातील सर्वांच्या मनावर राज्य करणाऱ्या तिन्ही खानांचे वय ५६ किंवा ५७ वर्षे किंवा या आसपास आहे. जर बिना मेकअप आपण त्यांच्या चेहऱ्यावर पाहिलं तर केस पांढरे झालेले दिसतात, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या आहेत. देहबोलीत थोडासा बदल झाला आहे, परंतु चित्रपटांमध्ये मेकअपच्या जीवावर हे अभिनेते अधिक सुंदर, व खूप स्मार्ट दिसतात.

परंतु आजही या तिन्ही खान बाबत लोकांच्या मनात विशेष स्थान आहे, ते आजही चित्रपट कारकिर्दीत यशाची पावती फडकवताना दिसतात. बॉलीवूडच्या दुनियेत हे तिन्ही खान आपला लूक कायम राखण्यासाठी त्यांच्या मेकअपवर खूप खर्च करतात, सूत्रांनुसार, ते त्यांच्या मेकअपवर पाण्यागत पैसे खर्च करतात. सलमान खान असो किव्हा शाहरुख खान असो किव्हा आमिर असो, हे तिघे वेळोवेळी सोशल मीडियावर आपले फोटो पोस्ट करत असतात.

आणि बऱ्याचदा त्या फोटोंमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या स्पष्ट दिसतात. जर तुमची नजर तीक्ष्ण असेल तुम्ही नक्कीच ओळखताल की त्यांच्या चेहऱ्यावर किती फरक पडला आहे. . एकदा शाहरुख खानने एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये त्याची दाढी वाढलेली होती आणि अश्या वाढलेल्या दाढीमुळे तो खूप म्हातारा दिसत होता.

सर्वात आधी बोलूया आमिर खानबद्दल, आमिर खानला आपण बऱ्याचदा टीव्हीवर पाहिलेलं आहे आणि तो टीव्हीवर खूप सुंदर दिसतो, परंतु आपल्याला माहिती पाहिजे तो स्मार्ट दिसतो त्यामागे सर्व मेकअपची कृपा आहे, परंतु बिनामेकप पाहिलं तर त्याच्या डोक्याचे पांढरे केस आणि दाढीचे पांढरे केस हे सर्व सांगून जाता. शिवाय दंगल चित्रपटादरम्यान त्याचा खरा लूक दिसला होता ज्यामध्ये आमिर खानचे वय स्पष्ट दिसत होते.

हिंदी चित्रपटसृष्टीत सुंदर डोळे वर आपल्या बॉडी च्या जीवावर लोकांच्या मनात राज्य करणारा सलमान खानबद्दल बोलू. सलमान देखील मेकअपवर किती खर्च करतो, हे त्याच्या फोटोवर दिसून येत सलमान खान चित्रपटात जवळपास दाढीमध्ये दिसत नाही, पण जेव्हा तो सार्वजनिक ठिकाणी दाढी वाढवून लोकांसमोर येतो तेव्हा त्याच्या दाढीचे पिकलेले केस स्पष्टपणे दिसतात.

अशाच एका मुलाखतीत सलमान खानने गंमतीत सांगितले की, माझ्या वयाचे सर्व लोक आजोबा झाले आहेत, जर माझे वेळेवर लग्न झाले असते तर मीही आजोबा झालो असतो.

आता शाहरुख खानबद्दल बोलूया शाहरुख खानने आपल्या मोहक हसतमुख चेहरा तसेच अभिनयामुळे आणि चित्रपटांमधील डायलॉग मुळे लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे, परंतु जेव्हा तो सार्वजनिकरित्या येतो तेव्हा कॅमेरात त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात आणि म्हातारपण आलेल आहे स्पष्ट दिसते.

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणने एकापेक्षा एक चित्रपट केले आहेत. करिअरच्या सुरुवातीला खूपच सिरीयस सिनेमे केले आणि नंतरच्या काही काळानंतर तो कॉमेडी चित्रपट करतानाही दिसला. बोल बच्चन, गोलमाल यांसारख्या चित्रपटात त्यांचा अभिनय लोकांना हसवत होता. अजय देवगण अजूनही जबरदस्त अॅक्शन सिनेमे करतो, पडद्यावर तो जसा दिसतो तसा खऱ्या आयुष्यात असेल असं नाही.