बॉबी देओलला नादाला लावून मग ब्रेकअप करून का गेली ही सुप्रसिद्ध अभिनेत्री.. रात्री अपरात्री घ्यायचा-

प्रेम,नातं,दुरावाया गोष्टी आपण सतत आपल्या आजूबाजूला बघत असतो. अनेक लोकं एकमेकांच्या प्रेमात अक्षरशः वेडे होतात. मात्र छोट्या मोठ्या कारणांनी हे लोक वेगळेसुद्धा होतात. बॉलीवूडमध्ये सुद्धा असे अनेक कलाकार आहेत जे कधीकाळी एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते.

पण म्हणतात ना सगळ्याच गोष्टी मनासारख्या होतातच असं नाही. त्याप्रमाणेच या कलाकारांनी एकमेकांवर प्रेम तर केले मात्र वेळेनुसार याचं प्रेम कमी होतं गेलं. आणि यांच्या नात्याला पूर्णविराम लागला. अभिनेता बॉबी देओल आणि अभिनेत्री नीलम ही एक अशीच जोडी आहे.

कोणतही नातं टिकवण्यासाठी प्रेम आणि विश्वास असणं खूप गरजेचं असतं. एखाद्या नात्यात या दोन्ही गोष्टींचा अभाव असेल तर ते नातं टिकण कठीण असतं. कोणत्याही नात्यात आपण स्वतः समाधानी असणं आवश्यक आहे. मात्र आपल्यला तो समाधान जाणवत नसेल, किंवा त्या नात्यात आधीसारख प्रेम वाटतं नसेल. तर ते नातं अल्पायुषी असतं.

काही नाती अशी असतात ज्यात वेळेनुसार सामंजस्य आणि प्रेम वाढत जातं. तर काही नाती अशी असतात ज्यात प्रेम कमी होतं जातं, आणि एकमेकांना समजून घेण्याची मनस्थिती कमी होते. तयमुले काही लोक अशा नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात.

अभिनेत्री नीलमनं असचं काहीसं केलं होतं. नीलम आणि बॉबी देओल तब्बल 5 वर्षे नात्यात होते. हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते.मात्र वेळेनुसार सर्व काही बदलत गेलं. आणि एकवेळ अशी आली की या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

एका मुलाखती दरम्यान नीलमनं याबद्दल खुलासा केला होता. नीलमनं म्हटलं होतं. आपलं खाजगी आयुष्य खाजगी राहिलेलं बरं त्याला सर्वांसमोर आणण्याची माझी इच्छा नाही. मात्र अशा काही गोष्टी कानावर येत आहेत त्यामुळे या गोष्टी स्पष्ट करणं भाग आहे. मी आणि बॉबी वेगळे झालो आहोत. हे खरं आहे.

एखाद्या नात्यामध्ये आपण समाधानी असणं आवश्यक आहे. मात्र तुम्ही जर तुमच्या नात्यात समाधानी नसाल. तर तुम्ही एकमेकांपासून विभक्त होणे हाच एक पर्याय असतो. पाच वर्षानंतर मला जाणवलं की मी यात समाधानी नाहीय. मला वाटू लागलं की मी पूर्ण आयुष्य या नात्यात खुश नाही राहू शकणार

असं ही म्हटलं जातं की दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. परंतु बॉबी हा नीलम च्या मानाने कमी यशस्वी होता. त्याउलट नीलम ही दिवसेंदिवस प्रसिद्ध होत चालली होती. त्यामुळे अनेक सिनेमे तिच्या वाटेला आले सोबतच अनेक अभिनेत्यांसोबत तिचे नाव जोडले जाऊ लागले. याच गोष्टी वरून बॉबी रात्री अपरात्री तिच्यावर संशय घेऊ लागला.

नीलमने दोन लग्ने केली आहेत. नीलमने पहिले लग्न ब्रिटनमधील व्यावसायिकाचा मुलगा रिशी सेठिया, सोबत झाले होते. परंतु नीलमचे पाहिले लग्न अयशस्वी ठरले नंतर मग २ जानेवारी २०११ रोजी तिने प्रसिद्ध टीव्ही अभिनेता समीर सोनीशी लग्न केले.

लग्नाच्या दोन वर्षानंतरही अपत्य होऊ न शकल्याने नीलम आणि समीरने एका मुलीचा दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.त्यांच्या मुलीचे नाव अहाना आहे.निलम अनेकदा आपल्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. सध्या नीलम ‘नीलम ज्वेलर्स’ नावाची कंपनी चालवित असून आपला व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे.