ह्या बॉलीवूड कलाकारांना लग्नानंतर झाले दुसऱ्यावर प्रेम, नंबर ५ वाल्याने तर घट स्फो ट न देताच केले दुसरे लग्न

बॉलिवूड कलाकार बर्‍यापैकी मोकळ्या मनाचे आहेत. आयुष्यात ते असे अनेक निर्णय घेतात ज्यामुळे बरेच लोक त्यांच्याकडे आक्षेपाने बघतात. परंतु त्यांना त्याची अजिबात खंत वाटत नाही. ते त्यांचे दैनंदिन जीवन नेहमीप्रमाणे जगत राहतात.

असे बरेच स्टार्स आहेत ज्यांनी आपल्या पहिल्या पत्नीबरोबर सुखी वैवाहिक जीवन जगलेले नाही. या कारणास्तव, त्यांनी त्या जीवनातून पुढे जाण्याचे आणि नंतर त्यांचे खरे प्रेम शोधण्याचे ठरविले. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलिवूड स्टार्सबद्दल सांगणार आहोत ज्यांना त्यांच्या लग्नानंतर त्यांचे खरे प्रेम मिळाले.

फरहान अख्तर : बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरने वर्ष २००० मध्ये अधुना भाबानीशी लग्न केले. १७ वर्षानंतर, वैयक्तिक कारणास्तव दोघे वेगळे झाले. घट स्फो टानंतर शिबानी दांडेकर यांनी फरहानच्या आयुष्यात प्रवेश केला.दोघेही बऱ्याच काळासाठी एकत्र राहिले. त्यांच्या लग्नाच्या बातम्या बर्‍याचदा समोर आल्या होत्या.

सैफ अली खान : सैफ अली खानने त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अमृता सिंगशी लग्न केले. सैफने स्वत: अमृताला लग्नाचा प्रस्ताव दिला होता. पण लग्नानंतर या दोघांच्या नात्यात फूट पडली. तब्बल १३ वर्षानंतर या जोडप्याने घट स्फो ट घेतला. टशन या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सैफचे मन करीना कपूरकडे वळले होते. आणि यानंतर २०१२ मध्ये दोघांचे लग्न झाले.

अर्जुन रामपाल : अर्जुन रामपालने १९९८ साली सुपर मॉडल मेहर जेसियाशी लग्न केले. त्या दोघांचेही नाते चांगले चालले होते, पण नंतर दोघांमध्ये कलह सुरू झाला आणि शेवटी वर्ष २०१९ मध्ये दोघे वेगळे झाले. विवाहित अर्जुन रामपाल घट स्फो टाच्या आधी गॅब्रिएला डेमेट्रिएड्सचे हृदय देऊन बसला होता. आता दोघांनाही एक मुलगा आहे.

अमिर खान : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचे आयुष्यही असेच होते. १९८६ मध्ये त्यांनी रीना दत्ताशी लग्न केले. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही आणि मग दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लगानच्या सेटवर आमीरने किरण राव यांची भेट घेतली आणि त्यानंतर दोघांचे लग्न झाले.

धर्मेंद्र : बॉलिवूडचा ही मॅन म्हणून ओळखल्या जाणार्‍या अभिनेता धर्मेंद्रनेही दोन विवाह केले आहेत. परंतु त्याने इतर सेलिब्रिटींप्रमाणे आपल्या पहिल्या पत्नीला घट स्फो ट दिला नाही. धर्मेंद्रने चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वीच लग्न केले होते. पण मुंबईत आल्यानंतर ते हेमा मालिनीच्या प्रेमात पडले. हिंदू धर्मात, दोन विवाहांना मनाई आहे, म्हणून त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि लग्न केले.