एका पाकिस्तानीसोबत लग्न करुन आयुष्य बरबाद करून बसली ‘ही’ 80च्या दशकातील टॉपची अभिनेत्री.. आता होतोय पश्चात्ताप..

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचदा असे पाहिले गेले आहे की प्रत्येक वेळी कोणी ना कोणी आपल्या प्रेमसंबंधांमुळे चर्चेचा भाग बनलेला असतो. आणि जर बॉलिवूड मधील एखादा कलाकार इतर देशातील विशेषतः जर पाकिस्तानी असेल तर अशा वेळी ते बातमीपत्रात थेट हेडलाईन गाठतात.अशा परिस्थितीत चित्रपटातील कलाकारांमधील नात्यांची चर्चा नेहमीच होत असते.

प्रेमात पडणं हा टप्पा खरंतर आयुष्यातील सर्वात सुंदर काळ मानला जातो. परंतु हेच प्रेम जर चुकीच्या माणसावर केले तर एखाद्याचे आयुष्य बरबाद होऊ शकते. बॉलीवूड मध्ये देखील असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी प्रेमविवाह केले तर खरे पण आता त्याचा त्यांना पश्चात्ताप होतोय.

आज आम्ही तुम्हाला आशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी आपल्या करिअरच्या सर्वोच्च उंचीवर असताना प्रेमात पडली. ते ही एक पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत. परंतु आताच्या क्षणी मात्र तिला आपला तो निर्णय निव्वळ मूर्खपणा वाटत असून आता तिच्याकडे पश्चात्ताप करण्याशिवाय काहीही पर्याय नाहीये.

आम्ही बोलत आहोत अभिनेत्री रीना रॉय बद्दल. एकेकाळी विशेषतः 80च्या दशकात अभिनेत्री रीना रॉय हे नाव प्रत्येक तरुणाच्या हृदयावर राज्य करत होते. ती आपल्या फिल्मी करिअरच्या सर्वोच्च उंचीवर होती व पुढचे काही वर्षे तिचे हे स्थान अढळ अशी चिन्हे दिसत होती. परंतु नियतीला मात्र काही औरच मान्य होते.

रीना रॉय ने ‘जरूरत’ या चित्रपटातुन बॉलीवूड मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला. रीना रातोरात सुपरस्टार झाली. तिच्या सोबत काम करण्यासाठी अनेक निर्माते आणि दिग्दर्शक यांची जणू रांग च लागली. जरूरत नंतर तिने अनेक हिट चित्रपट केले. परंतु तिच्या करिअरला कलाटणी देणारा चित्रपट ठरला तो म्हणजे ‘नागीन’.

‘नागीन’ चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर च्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री साठी नामांकन देखील मिळाले होते. त्यांनंतर मात्र रीनाला मागे वळून बघावे लागले नाही. एकापेक्षा एक हिट चित्रपट ती देत गेली आणि तिची गणना दशकातील टॉप अभिनेत्री पैकी एक म्हणून होऊ लागली.

पण याच कालावधीमध्ये रिनाच्या आयुष्यात पाकिस्तानी क्रिकेटर मोहसीन खानची एन्ट्री झाली. त्या दोघांमध्ये खुप चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यावेळी रीना रॉय यशाच्या शिखरावर होत्या परंतु प्रेमापोटी त्यांनी करिअरचा विचार न करता लग्न करण्याचा निर्णय घेतला.

लग्न केल्यानंतर त्यांनी सर्व काही सोडले आणि हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरली. रीना रॉयने ज्यावेळी पाकिस्तानी क्रिकेटर मोहसीन खानसोबत लग्न केले त्यावेळी त्यांनी बॉलीवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्याकाळी त्यांना योग्य वाटला असला तरी त्याचे दूरगामी परिणाम मात्र त्यांना नंतर भोगावे लागले.

पाकिस्तानमध्ये त्यांनी आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली तर खरी पण लग्नानंतर काही दिवसांमध्येच रीना आणि त्यांच्या पतीमध्ये वाद सुरू झाले. वाद वाढू लागल्याने दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा नोर्णय घेतला. त्यामुळे घट-स्फोट घेऊन रीना पुन्हा भारतात आल्या.

रिना रॉयने स्वत: एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या की, प्रेमाच्या मोहामध्ये मी सर्व काही गमावून बसले. जे मी कठोर परिश्रम घेऊन मिळवले होते.’ परत आल्यानंतर त्यांना बॉलीवूडमध्ये यश मिळाले नाही. त्यामुळे आता त्या भारतात एकाकी जीवन जगत आहेत.