‘ह्या’ सुप्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांना व्हायचं होतं सैन्यदलात सामील.. 3 नंबर कलाकार तर आहे अक्षयपेक्षाही मोठा देशभक्त..

भारताची अस्मिता असलेलं ‘भारतीय सैन्यदल’ हे कायमच आपण भारतीयांसाठी जिव्हाळ्याचा तसेच अभिमानाचा विषय राहिलेलं आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या भारतीय सीमेचं रक्षण करणाऱ्या तमाम सैनिकांबद्दल आपल्याला अभिमानच नाही तर गर्व आहे. त्यांच्याबद्दल कितीही लिहिले गेले तरी कमीच. सर्वच भारतीयांच्या हृदयात सैन्य दलाबद्दल नितांत आदर आहे.

अलीकडच्या काळात पाकिस्तान, चीन सारख्या देशांसोबत सीमेवर चालू असलेल्या चकमकींच्या घटना सर्रास ऐकू येतात. अशा परिस्थितीत आपण पाहत आहोत की बहुतेक मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण भारतीय सैन्यात भरती होण्यास तयार आहेत. खरंतर सर्वच वर्गातील लोकं सैन्यात भरती होण्यास उत्सुक आहेत परंतु यामध्ये मध्यमवर्गीयांची संख्या जरा जास्त आहे.

भारतीय सैन्यात सामील होणे आणि तो गणवेश परिधान करणे ही स्वत: साठी अभिमानाची बाब आहे आणि हा अभिमान सर्वांनाच हवाहवासा आहे. आपण पाहिले असेलच की आपल्या चित्रपटांमध्ये बरेच नायक किंवा नायिका इत्यादी सैन्याच्या जवानांची किंवा अधिकाऱ्यांची भूमिका निभावतात आणि त्यांच्यातील काही जण त्यांच्या शरीरयष्टी मुळे अगदी लष्करी सैनिकांसारखे दिसतात.

आज आम्ही तुम्हाला अशा बॉलिवूड स्टार्सविषयी सांगणार आहोत ज्यांना चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी सैन्यात भरती व्हायचे होते पण दुर्दैवाने त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. चित्रपट सृष्टी मध्ये तर ते अपघाताने आले आहेत पण त्यांचं खरं प्रेम अजून ही भारतीय सैन्यदलच आहे. तर मग जाणून घेऊया सैन्यात सामील होऊ इच्छित असणारे कलाकार आहेत तरी कोण.

अक्षय कुमार: सुपरस्टार खिलाडी अक्षयकुमार ला आपण सर्वपरिचित आहातच. सध्याच्या घडीला सर्वात कास्ट देशभक्त गणल्या जाणाऱ्या व्यक्तींपैकी अक्षय कुमार हा एक आहे. आणि हे फक्त नावाला नसून त्याने वेळोवेळी आपल्या कृतीतून देखील सार्थ केले आहे. मागील काही वर्षांत अक्षय कुमारने देशभक्तीपर अनेक चित्रपट केले आहेत ज्यामुळे त्याचे देशप्रेम लोकांना दिसून आले

अक्षयचे वडील भारतीय सैन्यात होते ही बाब फारच कमी लोकांना माहित आहे. वडील सैन्यात असल्यामुळे अक्षयचाही कल लहाणपणी पासूनच सैन्याकडे होता. पण नशीबाने अक्षयला साथ दिली नाही आणि तो हिंदी चित्रपटसृष्टीत आला जेथे आज तो सुपरस्टार झाला आहे. अक्षय कुमार सैन्यात सामील होऊ शकला नाही तरी त्याने शहीदांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी एक वेबसाइट सुरू केली आहे ज्यात देशातील कोणताही नागरिक शहीद कुटुंबियांना आर्थिक मदत करू शकेल.

निम्रत कौर: अभिनेत्री निम्रत कौरचं संपूर्ण कुटुंबच आर्मीशी संबंधित असल्यामुळे तिला स्वतःला देखील भारतीय सैन्यात भरती व्हायची इच्छा होती, पण बर्‍याच प्रयत्नांनंतरही तिला सामील होता आलं नाही. ती सैन्यात सामील होण्यासाठी पूर्णपणे तयार नाही आहे कळाल्यावर तिने आपला मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला. नंतर तीने चित्रपट सृष्टीत हात आजमावले.

सोनू सूद: बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमधील एक सशक्त अभिनेता सोनू सूद यांचे भारतीय सैन्यात भरती होवून देशसेवा करण्याचे स्वप्न होते, परंतु दुर्दैवाने त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. नंतर तो ग्लॅमरच्या जगाकडे वळला आणि येथे त्याने यशस्वीरित्या आपला ध्वज फडकविला आहे. कोरोना काळातही या अभिनेत्याने अनेक गरीब कुटुंबातील लोकांना मदतीसाठी हात पुढे केला. त्याच्या या उपक्रमाची सोशल माध्यमांवर प्रचंड वाहवा झाली व अनेकांनी त्याचे कौतुक केले. सोनुने त्याच्या कामाने साध्य केले आहे की सध्याच्या घडीला बॉलिवूड सर्वात मोठा देशभक्त तोच आहे

रण विजय सिंह: अत्यंत प्रसिद्ध टीव्ही शो रोडीजचा पहिला विजेता म्हणून प्रसिद्ध असलेल्या रणविजयसिंग याचेही स्वप्न होते की त्याने भारतीय सैन्य दलात सामील व्हावे. त्याने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की त्याच्या आधीच्या पाच पिढ्यांनी भारतीय सैन्यात काम केले आहे. पण जेव्हा त्याची निवड रोडीजमध्ये झाली, त्यानंतर त्याने आपले मत बदलले. आजा रणविजय बॉलिवूडमध्ये त्याचा हात आजमावत आहेत.