बॉक्स ऑफिसवर रणबीर-आलियाचा ‘ब्रम्हास्त्र’; आत्तापर्यंत केली इतक्या कोटींची कमाई

बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. रिलीजच्या तिसऱ्या रविवारीही ‘ब्रह्मास्त्र’ने बॉक्स ऑफिसवर 5 कोटींहून अधिक कमाई केली आहे. यासह ‘ब्रह्मास्त्र’ने 250 कोटी कमावण्याच्या दिशेने आपली पावलं वाढवली आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ या वर्षातील सर्वात हिट चित्रपट होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती आहे.

बॉक्स ऑफिसवर ‘ब्रह्मास्त्र’चा दबदबा कायम 


दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाने रिलीजच्या 16व्या दिवशी धमाका केला आहे. बॉक्स ऑफिसवर ‘ब्रह्मास्त्र’ने तिसऱ्या रविवारी चांगलीच कमाई केली आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या या चित्रपटाने ‘ब्रह्मास्त्र’च्या 16व्या दिवशी तिसऱ्या रविवारी 5.70 कोटींची कमाई केली आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या व्यवसायाचे हे आकडे सर्व भाषांमध्ये आहेत. या कमाईसह ‘ब्रह्मास्त्र’ हा यावर्षीच्या तिसऱ्या रविवारी सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे.

या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जगभरात सर्वाधिक 75 कोटींची कमाई करणारा ‘ब्रह्मास्त्र’ हा एकमेव हिंदी चित्रपट असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर या चित्रपटाने जगभरात पहिल्या वीकेंडला 225 कोटींचा गल्ला जमवून इतिहास रचला आहे. त्याचबरोबर चाहत्यांनाही हा चित्रपट खूप आवडतोय.

‘ब्रह्मास्त्र’च्या एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत बोलायचं झालं तर, रणबीर कपूरच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 243 कोटींची कमाई केली आहे. ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच 250 कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. रिपोर्टनुसार, ‘ब्रह्मास्त्र’ने आतापर्यंत जगभरातील कलेक्शनच्या बाबतीत 390 कोटींहून अधिक कमाई केली आहे. येत्या आठवडाभरात ‘ब्रह्मास्त्र’च्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते.