‘देवमाणूस’ मध्ये झालीये ‘या’ हॉट अभिनेत्रीची एन्ट्री.. शेवंताला देणार टक्कर..

झी मराठी आणि मराठी माणूस यांच्यात एक अतूट नातं आहे. झी मराठी वर अश्या अनेक सीरिअल्स आल्या आहेत ज्या संपून एक मोठा काळ उलगडला तरीही अजूनही त्या प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा दुसरा भाग नुकताच संपला. ही मालिका अतिशय प्रसिद्ध झाली ती अण्णा नाईक आणि शेवंता यांच्या गाजलेल्या लव्ह स्टोरीमुळे.

आता रात्रीस खेळ चाले ही मालिका संपून तिच्या जागी ‘देवमाणूस’ ही नवीन मालिका सुरू झाली. ही मालिका देखील अतिशय लोकप्रिय झाली आहे. एका गावात डॉक्टर म्हणून वावरणाऱ्या सिरिअल कि-लरची ही गोष्ट आहे ज्याला गावातले लोक देवमाणूस समजत आहेत. या डॉक्टर ची भूमिका अतिशय स्त्रीलंपट प्रकारची दाखवली असून अभिनेता किरण गायकवाड ही भूमिका निभावत आहेत.

भोळ्या भाबड्या स्त्रियांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचा जीव घेणे हे या पात्राचं काम दाखवले गेले आहे. या मालिकेत आतापर्यंत डॉक्टरचा जीव मंजुळा नावाच्या एका सुंदर स्त्रीवर आला होता, जिचा त्याने नुकटाच काटा काढला आहे. अशातच आता या मालिकेत मंजुळा नंतर आणखी एका ग्लॅमरस स्त्रीपात्राने एन्ट्री घेतली आहे.

परंतु आत्ता या मालिकेत एका नवीन भूमिकेची एंट्री होणार आहे. या मालिकेच्या प्रोमो नुसार एक शहरातील मुलगी गावाकडे येताना दिसत आहे. ती खूपच मॉडर्न आहे. या मुलीचा चेहरा आपल्याला दिसत नाही परंतु ही मुलगी आहे तरी कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ही मुलगी आहे अभिनेत्री नेहा खान.

अभिनेत्री नेहा खान ही एक प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने खूप साऱ्या मराठी, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. नेहा खान हिचा शिकारी हा मराठी चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटात तिने बोल्ड भूमिका साकारली होती.

आत्ता देखील ती देवमाणूस या मालिकेत एका बोल्ड आणि बिनधास्त मुलीची भूमिका साकारणार आहे. आत्ता ती इतरांप्रमाणे डॉक्टरच्या जाळ्यात फसेल की डॉक्टरचा खरा चेहरा सर्वांसमोर आणेल हे लवकरच आपल्याला येत्या भागात कळेल.

शिकारी’ चित्रपटातून नेहाने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात तिने बोल्ड भूमिका केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातील तिच्या बोल्ड अंदाजामुळे ती चर्चेत आली होती. आता नेहा लवकरच मालिकेत दिसणार आहे. ती पहिल्यांदाच मालिकेत काम करताना दिसणार आहे. आता तिच्या या मालिकेतील तिचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. त्यात तिची झलक पहायला मिळत आहे

या व्हिडीओत ती गाडीतून डॅशिंग अंदाजात उतरताना दिसते आहे. यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. नेहा खानचे चाहते तिला मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. नेहा खान शिकारी चित्रपटानंतर ‘काळे धंदे’ या झी ५ वरील वेबसीरिजमध्ये झळकली होती. या सीरिजमधल्या त्याच्या कामाचे खूप कौतूक झाले. तसेच झी युवा वरील युवा डान्सिंग क्वीन शोमध्ये ती सहभागी झाली होती. त्यात तिने आपल्या नृत्याची झलक दाखवली होती.

नेहाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत ‘१९७१ बियॉण्ड बॉर्डर्स’ मल्याळम चित्रपटाचा तेलगू रिमेक ‘१९७१ भारता सरीहद्दू’मध्ये काम केलं आहे. याशिवाय ‘अझाकिया कादल – ब्युटिफुल लव’ या मल्याळम सिनेमातही तिने प्रमुख भूमिका साकारली होती.