देवोलीना भट्टाचार्य बाहेर काढलं बॉलिवूड ‘काळ’ रहस्य, म्हणाली बॉलिवूडमध्ये आम्हाला डायरेक्टरच्या खाली झो…

मोठ्या पडद्याप्रमाणेच टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील स्टार्स ची सुद्धा फॅन फॉलोइंग लाखो मध्ये असते. प्रत्येक प्रेक्षक त्याच्या आवडत्या मालिका आणि शोबद्दल जागरूक असतो. त्यांचे आवडते टीव्ही कलाकार आणि अभिनेत्री त्यांच्या आवडत्या मालिकांवर आधारित असते. अशीच एक मालिका साथ निभाना साथिया ही प्रेक्षकांची आवडती मालिका आहे.

या मालिकेची अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य हिचा स्वतःचा वेगळा चाहता वर्ग आहे. देवोलिना भट्टाचार्य एक उत्तम आणि प्रशंसनीय टीव्ही अभिनेत्री आहे. नुकतेच, देवोलिना भट्टाचार्यने तिचे दुःख सांगताना एका मुलाखतीत सांगितले की, इंडस्ट्रीत टीव्ही कलाकारांसोबत खूप भेदभाव केला जात आहे.

देवोलिना नुकतीच टीव्हीची दुनिया सोडून मोठ्या पडद्यावर काम करणार आहे आणि तिच्याकडे फर्स्ट सेकंड चान्स ही शॉर्टफिल्म आहे ज्याचे दिग्दर्शन लक्ष्मी आर. अय्यर यांनी केले आहे. देवोलीनाचा चित्रपट फर्स्ट सेकंड चान्स, जो ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने हॉटस्टारवर 5 जून रोजी प्रदर्शित होत आहे, त्यात देवोलिना वैदेहीच्या भूमिकेत दिसणार आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत देवोलिना म्हणाली की “टीव्ही कलाकारांसोबत नेहमीच भेदभाव केला जातो आणि त्यांना अपेक्षित यश आणि संधी मिळत नाहीत.” कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्ये अभिनेत्री हिना खाननेही याची पुष्टी केली आहे.

बॉलीवूडमध्ये काम करण्याऐवजी टीव्ही इंडस्ट्रीत काम केल्यामुळे टीव्ही कलाकारांना कसा संघर्ष करावा लागतो हेही तिने सांगितले. टीव्ही अभिनेत्री हिना खानच्या समर्थनात देवोलिना म्हणाली की “ती खरंच बोलत आहे. या इंडस्ट्रीचा खरा चेहरा उघड करत आहे. इतर सर्व टीव्ही कलाकार हे सहन करत आहेत.

एखाद्या प्रतिभावान अभिनेत्याला तो केवळ टीव्ही अभिनेता आहे म्हणून मोठ्या पडद्यावर येण्यापासून नकार देणे अयोग्य आहे . चित्रपटसृष्टीत टीव्ही कलाकारांना अपमानास्पद वागणूक देणे व त्यांना खालच्या दर्जाचं मानणे असा बऱ्याच काळापासून ट्रेंड चालत आला आहे.

देवोलीनाने सांगितले की, जर मी अभिनय निवडला तर मला अनेक संधी मिळतील आणि जर तिने अभिनेत्री होण्याचे ठरवले तर तिला तिच्या संधी मर्यादित कराव्या लागतील. या दोन निवडींपैकी तिने पहिली निवड केली.”