अरबाज खानच नव्या आयटम वरून पण मनं उडालं, आता म्हणतोय नवीन कवळ पाखरु…

बॉलीवूड अभिनेता,निर्माता,दिग्दर्शक अरबाज खान त्याच्या सिनेमांपेक्षा मलायकासोबतच्या घटस्फोटामुळे आणि नंतर त्याच्या लव्हलाईफ मुळे अधिक चर्चेत आहे. मलायकाशी घटस्फोट झाल्यानंतर अरबाजच्या आयुष्यात अभिनेत्री-मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी आली. पण आता तिच्यासोबतही अरबाजचं नातं तुटल्याची बातमी समोर येत आहे.

आता अरबाज आणि जॉर्जियात काहीतरी बिनसल्याची चर्चा तेव्हा सुरु झाली जेव्हा जॉर्जियानं एका मुलाखतीत अरबाजसोबतच्या आपल्या नात्यावर स्पष्ट भाष्य केलं. जॉर्जियाने अरबाजला आपला बॉयफ्रेंड नाही तर एक चांगला मित्र म्हणून त्या मुलाखतीत संबोधलं आहे. जॉर्जियाच्या म्हणण्यानुसार तिचा आणि अरबाजचा लग्नाचा कोणताच प्लॅन नाही. दोघांचे नाते कोरोना दरम्यान लागलेल्या लॉकडाऊननंतर खूप बदललं.

मुलाखतीत जॉर्जियाला तिच्या आणि अरबाजच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला गेला. उत्तरादाखल अभिनेत्री बोलली-”मी मलायका आणि अरबाजच्या कुटुंबाला अनेकदा भेटली आहे. अरबाज माझा खूप चांगला मित्र आहे. पण आमचा लग्नाचा कोणताच विचार नाही. लॉकडाऊनने आमच्या नात्याला खूप बदललं आहे”.

एका हिंदी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत जॉर्जिया म्हणाली आहे-”जसं मी म्हटलं की अरबाज आणि मी चांगले मित्र आहोत. पण लग्नाचा प्रश्न विचारला म्हणून सांगते की खरंच..आमचा लग्नाचा काहीच प्लॅन नाही. लॉकडाऊनने आम्हाला असा विचार करायला भाग पाडलं. लॉकडाऊनमुळे एकतर लोक एकमेकांच्या जवळ आले किंवा लॉकडाऊनने लोकांना दूर केलं”.

आता ज्या पद्धतीनं जॉर्जियानं आपले विचार मांडले आहेत,त्यावरनं तरी स्पष्ट होतंय की अरबाज आणि जॉर्जिया एकमेकांचे फक्त चांगले मित्र आहेत. कदाचित त्यांच्यातलं प्रेमाचं नातं संपलं आहे.