‘गझनी’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री ‘असिन’ सध्या काय करते ? त्या एका वाईट घटनेमुळे सोडलं होतं बॉलिवूड..

साऊथ आणि बॉलिवूडमध्य अभिनय क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर प्रसिद्ध असलेली अभिनेत्री असिनने आपला 35 वा वाढदिवस नुकताच साजरा केला. असिनने 2008 साली आलेल्या ‘गजनी’ या चित्रपटातून बॉलिवूड चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला.

तिने अनुष्का शर्माला पराभूत करून 2008 सालचा सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री पुरस्कार जिंकला. मल्याळम भाषिक असलेल्या असिनने वयाच्या 15व्या वर्षापासून मॉडेलिंगला सुरुवात केली. दिसायला सुंदर आणि अभ्यासात हुशार असिनला डॉक्टर व्हायची खूप इच्छा होती.

असिनने मल्याळम भाषेतील माकन जयकांतन वाका या चित्रपटातून पदार्पण केले . 2007 मध्ये झालेल्या एका ऑनलाइन सर्वेक्षणात तिला क्वीन ऑफ़ बॉलीवूड म्हटले गेले होते. असिनने आपल्या लघु कारकिर्दीत तमिळ, हिंदी आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले. यादरम्यान तिने तीन फिल्मफेअर पुरस्कारही जिंकले. असिन दक्षिण भारतीय चित्रपटाच्या गझीनीची नायिका होती.

2008 मध्ये जेव्हा या चित्रपटाचा रिमेक बॉलिवूडमध्ये आला तेव्हा सूर्याच्या जागी आमीरने पुढाकार घेतला होता परंतु असिनला महिला लीडसाठी कायम ठेवण्यात आले होते. 2008 मध्ये तिने ‘गजनी’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि येथेही चांगले नाव कमावले.

गजनी व्यतिरिक्त असिनने रेडी, खिलाडी 786, हाऊसफुल 2 आणि बोल बच्चन सारख्या चित्रपटांमध्येही काम केले. बॉलिवूडमध्ये असिनने सलमान खान, अक्षय कुमार, आमिर खान आणि अभिषेक बच्चन सारख्या मोठ्या स्टार्ससह सुपरहिट चित्रपट दिले. असिनने चित्रपटसृष्टीत तिच्या अभिनयासाठी बरेच नाव कमावले.

2015 मध्ये तीचा ‘ऑल इज वेल’ हा चित्रपट आला आणि त्यानंतर त्याने आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला. मध्यंतरी एका फॅनने असिन सोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर असिनने नंतर लग्न करण्याचे ठरवले, तेव्हा अक्षयने असिनला दिल्लीतील आपला मित्र राहुल शर्मा याची भेट घालून दिली. दोघेही मित्र झाले आणि नंतर लग्नाच्या बेडीत अडकले.

असिन सध्या दोन वर्षाची मुलगी आरिनची आई आहे आणि एक चांगली गृहिणी आहे. मायक्रोमॅक्सचे संस्थापक राहुल शर्मा यांना असिन ने जीवनसाथी म्हणून निवडले. असिनने वर्ष 2016 मध्ये उद्योगपती राहुल शर्माशी लग्न केले. ज्यानंतर असिन चित्रपटाच्या दुनियेपासून दूर गेली. असिन आणि राहुल यांची भेट अक्षय कुमारने करून दिली होती.

अक्षयमुळे आसीन आणि राहुलची ओळखी मैत्रीत बदलली आणि हळू हळू दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांचे नाती लग्नापर्यंत पोचले. असिन आणि राहुल यांचे लग्न होते. अक्षय लग्नाचा सर्वात खास पाहुणा होता. असिनने 19 जानेवारी 2016 रोजी उद्योगपती राहुल शर्माशी लग्न केले. असिन ख्रिश्चन आहे आणि राहुल हिंदू आहे. त्यामुळे त्यांना दोन्ही पद्धतीने 2 वेळा लग्न करावं लागलं.

अब्जाधीश व्यावसायिकाची पत्नी बनताच असिनने बॉलीवूडला अलविदा केला. ग्लॅमर वर्ल्डपासून दूर राहूनही ती आपल्या कुटुंबासह आनंदी आहे. आता असिनही तिच्या पतीचा 2000 कोटींचा व्यवसाय सांभाळत आहे. असिन तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप आनंदी आहे. राहुल आणि त्यांना एक मुलगी, आरिन आहे.

असिन सध्या आपल्या कुटुंबासमवेत गुडगाव येथे राहत आहे आणि आनंदी आयुष्य जगत आहे. असिनने इंडस्ट्रीला निरोप दिला आहे.एक उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच असिन भरतनाट्यम आणि कथकली मधील शिकाऊ डान्सर आहे. तिला एक किंवा दोन नव्हे तर तब्बल 8 भाषा समजतात व बोलताही येतात. असिनने आतापर्यंत 3 फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत.