तो आम्हाला जबरदस्तीने तसले ‘घाणेरडे’ चित्रपट बघायला लावायचा, अभिनेत्रीचा धक्कादायक आरोप

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफरच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गणेश आचार्य याच्यावर लैं’ गि’ क अ’ त्या’ चा’ र केल्याचा तसेच बळजबरीनं अ’ श्लि’ ल व्हिडिओ बघायला लावण्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गणेश आचार्यबरोबर काम करणाऱ्या एका महिला कोरिओग्राफरनं हे आरोप २०२० मध्ये केले होते.

गणेश आचार्य याच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिकारी संदीप शिंदे यानं अंधेरी इथल्या महानगर दंडाधिकारी न्यायालयात चार्जशिट दाखल केली आहे. गणेश आचार्य यांच्यासह त्याच्या असिस्टंटविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे.

याप्रकरणी सहाय्यक नृत्यदिग्दर्शकाशी चौकशी केली असता तिनं सांगितलं की,आता याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीच गणेश आचार्य यांनी हे आरोप फेटाळत ते निराधार असल्याचं म्हटलं होतं. महिला सहाय्यक नृत्यदिग्दर्शकानं पोलिसांकडे जेव्हा तक्रार दाखल केली तेव्हा गणेश यांच्या कायदेशीर टीमनं तिच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचं सांगितलं होतं.

काय घडलं होतं नेमकं?

गणेश आचार्यवर आरोप करणाऱ्या महिलेनं सांगितलं की, ‘गणेश आचार्य याच्याबरोबर लैं’ गि’ क संबंध नाकारल्यानंतर त्यांनी माझा छ’ ळ करायला सुरुवात केला. माझ्यावर अ’ श्ली’ ल कॉमेन्ट करणं, अ’ श्ली’ ल चित्रपट दाखवत विनय भंग ही केला.’ या महिलेनं पुढं असंही सांगितलं की, ‘गणेशनं मला सांगितलं की, यशस्वी व्हायचं असेल तर तुला माझ्यासोबत लैं’ गि’ क सं’ बं’ ध ठेवावे लागतील.

मी यासाठी नकार दिला आणि त्यानंतर सहा महिन्यांनी इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर असोसिएशननं माझं सदस्यत्व रद्द केलं. त्यानंतर २०१९ मध्ये एका बैठकीत मी गणेश आचार्य यांनी केलेल्या कारवाईला विरोध केला. तेव्हा त्यांनी मला शिवीगाळ केली. तसंच मला मारहाणही देखील केली. त्यांच्या एका महिला असिस्टंनं मला बेदम मारहाण केली, शिवीगाळ केली.

त्यानंतर मी पोलिसात गेले. त्यावेळी पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला. केवळ एक अदखलपात्र गुन्हा दाखल केला,’ असंही तिनं सांगितलं. गणेश आचार्य हे बॉलिवूडमधील नृत्य दिग्दर्शकांपैकी एक आघाडीचं नाव आहे. गणेश आचार्य यानं अनेक गाण्याचं नृत्य दिग्दर्शन केलं असून, त्यांना टॉयलेट : एक प्रेम कथा सिनेमातील गोरी तू लाथ मार गाण्याच्या नृत्य दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.