राणी मुखर्जीच्या आधी गोविंदाला या अभिनेत्रीसोबत करायचे होते लग्न.. मात्र, यामुळे होऊ शकले नाही लग्न

गोविंदा अभिनेता असा आहे की तो कुठलेही काम करू शकतो. गोविंदाने चरित्र यासोबतच कॉमेडी आणि खलनायकाची भूमिका देखील मोठ्या खुबीने आपल्या चित्रपटात साकारली आहे.80 90 च्या दशकामध्ये गोविंदाने अनेक चित्रपट हिट दिले आहेत. अगदी दहा वर्षांपूर्वी देखील गोविंदाचा पार्टनर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने देखील खूप कमाई केली होती.

गोविंदाचे कुली नंबर वन, ऑंटी नंबर वन यासह राजाबाबू हे चित्रपट प्रचंड चालले होते. कुली नंबर वन मध्ये त्याने दुहेरी भूमिका साकारून अनेकांची मनं जिंकली होती. तसेच या चित्रपटात देखील त्याची दुहेरी भूमिका होती. या चित्रपटात देखील त्याने प्रचंड चांगले काम केले होते. एक काळ असा होता की, दिग्दर्शक डेव्हिड धवन हे गोविंदा याला घेतल्याशिवाय चित्रपट करायचे नाही.

गोविंदासोबत त्यांनी अनेक चित्रपट केले होते. त्यांचे यातील बहुतांश चित्रपट हे अतिशय हिट ठरलेले आहेत. मात्र, कालांतराने ही जोडी फुटली. डेव्हिड यांचा मुलगा वरून धवन हा मोठा झाला आणि त्यानंतर आपल्या मुलासोबत त्यांनी चित्रपट केले. मात्र, त्यानंतर गोविंदा याने काँग्रेसच्या तिकिटावर खासदारकी लढवून निवडून आला.

मात्र, त्यानंतर त्यांनी निवडणूक लढवली नाही. राजकारणातील आपला अनुभव अतिशय वाईट होता, असे ते नेहमी सांगत असतात. गोविंदाचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलेले आहे. मात्र, गोविंदा याचे नाव राणी मुखर्जी यांच्या सोबत जोडले गेले होते. राणी मुखर्जी आणि त्याच्या प्रेमप्रकरणाची चर्चा त्यावेळी बराच काळ चालली होती.

मात्र, गोविंदाची पत्नी सुनीता हिला याबाबत माहिती मिळाली आणि याला पूर्णविराम मिळाला. राणी मुखर्जी आधी ही गोविंदा करिष्मा कपूर याच्या सोबत लग्न करायचे होते, अशी चर्चा त्याकाळी होती. गोविंदा आणि करिश्मा ने जवळपास पंधरा चित्रपटात एकत्र काम केले आहे. राजा बाबू या चित्रपटादरम्यान दोघांमध्ये अतिशय घनिष्ठ संबंध निर्माण झाल्याचे सांगण्यात येत होते.

त्यावेळी गोविंदाला तिच्यासोबत लग्न करायचे होते. त्यांच्या अफेअरच्या बातम्या देखील बाहेर येत होत्या. मात्र गोविंदा हा पूर्वीपासूनच विवाहित असल्यामुळे या दोघांचे प्रेम प्रकरण समोर जाऊ शकले नाही.