पत्नी आणि ५ महिन्याच्या मुलासोबत पूलमध्ये मजा करतांना दिसला हा भारताचा स्टार क्रिकेटपटू, तसेच पत्नीने शेअर केले हॉट फोटो

हार्दिक पांड्याला ३० सप्टेंबर २०२० रोजी मुलगा झाला. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांच्या मुलाचं नाव अगस्त्या आहे. काही दिवसांपूर्वीच अगस्त्याने त्याचा पहिला विमान प्रवास केला होता. त्याची माहिती हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्रामवर दिली होती. आता नताशाने त्याच्या मुलाचा पहिल्यांदा स्विमिंग पूलमध्ये जाण्याचा अनुभव कसा होता ते सांगितलं.

मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या नताशाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत याबाबतीत माहिती दिली. नताशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हार्दिक आणि मुलासोबतचे चार फोटो शेअर केले. त्यातील एकात ते पूलच्या बाजूला बसलेले दिसत आहेत.

दुसऱ्या फोटोत हार्दिक अगस्त्याला पाण्यात उतरवताना दिसत आहे. तर तिसऱ्या फोटोत नताशा मुलाला घेऊन पूलमध्ये उभी आहे. काळ्या रंगाच्या टूपीस बिकिनीमध्ये नताशा अतिशय सुंदर दिसत आहे.

चौथ्या फोटोत हार्दिक मुलासोबत पूलमध्ये आहे आणि नताशा शिडीवर बसून त्या दोघांना पाहत आहे. नताशाने तिच्या फोटोला कॅप्शन देताना लिहिलं की, ‘आमच्या मुलाचा आज पूलमधला पहिला दिवस.’ त्यानंतर नताशाच्या पोस्टवर एका तासात २ लाखांहून अधिक लाइक आलेले तर ५०० हून जास्त चाहत्यांनी त्यावर कमेंट केल्या होत्या.

नताशाने शेअर केलेलं फोटो चाहत्यांना नेहमीचं पसंत पडतात. त्यात तिने हार्दिकलाही टॅग केलं. नताशाच्या या पोस्टनंतर हार्दिकने त्याच्या अकाऊंटवरूनही काही फोटो पोस्ट केले. नताशा आणि हार्दिंक यांच्या फोटोत फारसा फरक नाही. त्यानेही सहा फोटो आणि दोन व्हिडिओ शेअर केले आहेत.

हार्दिकने ही पोस्ट शेअर करता अगदी थोड्यावेळात त्याच्या कुटुंबाचे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. अगदी १५ मिनिटांत या फोटोंवर २ लाखांहून अधिक लाइक आले होते. एवढंच नाही तर ७०० पेक्षा जास्त कमेन्टदेखील आल्या होत्या. फोटोंवर हार्दिकने लिहिलं, ‘पूलमध्ये खुपचं शांत आहे, मला वाटतंय माझा मुलगा वॉटरबेबी आहे.’