अरे बापरे ! Valentine च्या दिवशी आमीरच्या मुलीकडून थेट बेडरुम मधला ‘तो’ फोटो शेअर

आमिर खानची मुलगी सध्या प्रेमात आहे. आयरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत रिलेशनशिप एन्जॉय करत आहे, त्यामुळे आयराने हा प्रेमाचा दिवस खास पद्धतीने साजरा केला. आयरा खानने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने तिच्या प्रियकरासोबतचा एक खास फोटो शेअर केला आणि त्याला या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या फोटोमध्ये आयरा खान नुपूर शिखरेच्या डोक्यावर डोके ठेवून झोपली आहे. फोटो शेअर करताना तिने लिहिले – एकत्र दुपारी झोपणारे जोडपे एकत्र राहतात. व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा. तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा.

आयरा खान बॉलीवूड इंडस्ट्रीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, अनेकदा ती तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते.अलीकडे ती तिच्या साडी कलेक्शनमुळे खूप चर्चेत होती. कधी आई तर कधी आजीच्या साडीत आयराचा लूक चर्चेत राहिला आहे.

आमिर खानच्या मुलीने व्यक्त केली भीती

तिने या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, ‘मला अँझायटी अटॅक्स येऊ लागले आहेत. मला भीती वाटत आहे आणि मी अस्वस्थ व्हायचे. रडणे आणि फिट येणे चालूच आहे, परंतु मला यापूर्वी कधीही अँझायटी अटॅक आला नाही. हा पॅनिक आणि पॅनिक अटॅक यातील फरक आहे. अँझायटी vs अँझायटी अटॅक’

ती पुढे म्हणाली की, ‘जोपर्यंत मला याबाबत (Ira Khan Anxiety Attack) समजते  आहे, त्याची काही शारीरिक लक्षणे आहेत. हृदयाचे ठोके वाढणे, धाप लागणे आणि याशिवाय रडणे. यामध्ये वाढ होते. नाश येणार असे वाटते. मला तेच वाटते. पॅनिक अटॅक कसा असतो हे मला माहीत नाही.

ही खरोखरच खूप वाईट भावना आहे. माझ्या थेरपिस्टने मला सांगितले की जर हे नियमित असेल तर मला डॉक्टर किंवा थेरपिस्टला सांगावे लागेल.’