दीपिकानंतर आता अश्या कपड्यात दिसली जान्हवी.. ट्रेनरच्या सोबत जिम मधेच गाळला..

जान्हवी कपूर ही तिच्या अ‍ॅक्टिंगबरोबरच फिटनेसवरही तेवढेच लक्ष देते. जान्हवीचा वर्कआऊट करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हडिओमध्ये ती इंटेन्स वर्कआऊट करताना दिसत आहे. जिमदरम्यान जान्हवीने ऑरेंज कलरचे जिम विअर घातले आहे.

या लूकमध्ये ती अत्यंत कूल दिसत आहे. व्हिडिओमध्ये जान्हवीसोबत तिचा ट्रेनरही दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, जान्हवीच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर चाहत्यांची जबरदस्त पसंती मिळत आहे.

मिली चित्रपटात दिसली होती जान्हवी – जान्हवीच्या कामासंदर्भात बोलायचे झाल्यास, जान्हवी नुकतीच मिली या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयाचे चाहत्यांनी प्रचंड कोतुकही केले होते. या चित्रपटात तिच्याशिवाय, सनी कौशल, मनोज पाहवा देखील मुख्य भूमिकेत होते.

जान्हवी येणाऱ्या काही दिवसांत ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटात दिसणार आहे. यात राजकुमार राव तिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. एवढेच नाही, तर जान्हवी वरुण धवनसोबत ‘बवाल’ चित्रपटातही दिसणार आहे.

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे ग्लॅमरस लूकचे फोटो शेअर करत असते. जान्हवीने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. यात तिने ब्लॅक लेदर बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती.