एकेकाळी दिवसाला फक्त 50 रुपये कमावणारा ‘जेठालाल’.. आज एका एपिसोड साठी घेतो इतकी मोठी रक्कम..

छोट्या पडद्यावरील विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र चाहत्यांच्या मनावर राज्य करतं. जेठालाल हे पात्र तर लोकांना काही जास्तच भावतं. जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांनी आपला 53 वा वाढदिवस साजरा केला आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी.

दिलीप जोशी यांचा जन्म 26 मे 1968 मध्ये गुजरात (पोरबंदर) मधील ‘गोसा’ या गावी झाला होता. त्यांनी मुंबईमधून बी.कॉमची पदवी घेतली आहे. त्यांनी माध्यमांना दिलेल्या अनेक मुलाखतीमध्ये आपल्या सुरुवातीच्या करिअरबद्दल सांगितलं आहे.

त्यांनी सुरुवातीला एक बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांना या कामासाठी प्रत्येक दिवशी 50 रुपये मिळत असत.आज ‘तारक मेहता’…मध्ये काम करत त्यांनी आपल्या अभिनयाचा क्स दाखवून स्वतःला सिद्ध केलं आहे. आज ते मालिकेच्या एका एपिसोड साठी दीड लाख रुपये घेतात.

म्हणजेच ते महिन्यात 36 ते 37 लाख रुपये कमावतात. आज त्यांना प्रसिद्धीसोबत प्रचंड पैसा देखील मिळत आहे. ही मालिका जवळजवळ 12-13 वर्षे आपलं मनोरंजन करत आहे. आणि हे कलाकार दिवसेंदिवस लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचत आहेत.

मात्र एकवेळ अशीही होती जेव्हा दिलीप जोशी हे बेरोजगार होते. तारक मेहता…मिळण्यपूर्वी 1 वर्ष त्यांच्याकडे कोणतच काम नव्हतं. ते कामासाठी अनेक ठिकाणी भटकत होते. आणि आज या मालिकेने त्यांचं आयुष्यचं बदलून ठेवलं आहे.

या मालिकेनंतर त्यांनी कधीचं मागे वळून पाहिलं नाही.दिलीप जोशी यांनी चित्रपटांमध्ये सुद्धा छोटे मोठे रोल केले आहेत. त्यांनी हम आपके है कौन, हमराज, दिल है तुम्हारा, फिर भी दिल है हिंदुस्तानी अशा नावाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केल आहे.

.