एकेकाळी लाखों हृदयांची धडकन असलेल्या जुहीची मुलगी आहे तिच्यापेक्षा ग्लॅमरस.. फोटोज होतायत व्हायरल..

बॉलिवूड मध्ये सध्या नेपोटीझम वरून खूप गदारोळ सुरू आहेबॉलिवूड सध्या अशा एका टप्प्यातून जात आहे जिथे लवकरच मोठ्या कलाकारांची मुलेही चित्रपटांमध्ये ठसा उमटविण्यासाठी तयार आहेत. त्यात अनेक सुपरस्टार अभिनेता आणि अभिनेत्रींचे मुले मुली अधिच मोठ्या पडद्यावर झळकले आहेत तर काही जणांना अजून सुरुवात करायची आहे.

पण प्रत्येक स्टार कीड सक्सेस फुल होतोच असे नाही. कित्येकांची मुले आपला पाय इंडस्ट्रीत रोवण्यात यशस्वी झाले तर काहीजणाना प्रेक्षकांनी नापसंती दर्शवली. या श्रेणीत आणखी एक नाव जोडले जात आहे आणि ते म्हणजे जूही चावलाची मुलगी जान्हवी मेहता.

१९७९ मध्ये मिस इंडिया ब्युटी कॉन्टेस्ट जिंकल्यानंतर जूही चावलाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुरवातीला जुही ही तिच्या सौंदर्यामुळे आणि तिच्या वेगळ्या हास्यामुळे लोकांमध्ये चर्चित झाली. त्यानंतर तिने सिनेमात आपली अभिनय कला दाखवून प्रेक्षकांची मने जिंकली. जुहीने हिंदी, पंजाबी, बंगाली, तामिळ, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये अभिनय करून आपल्या कारकीर्दीत एक वेगळी ओळख निर्माण केली.

तिने अभिनयाच्या जोरावर कित्येक हिट सिनेमे दिले ज्यामुळे ती उच्चस्तरीय अभिनेत्रींच्या तक्त्यात नाव आपले उमटवण्यात यशस्वी झाली. तिच्या कारकिर्दीत तिला अनेक अवॉर्ड सुद्धा मिळाले आहेत. १९७९ सालच्या ‘सल्तनत’ मधून जुहीने बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. त्यानंतर “कयामत से कयामत”, इश्क,स्वर , राजू बन गया जेंटलमॅन या सारखे चित्रपट केले.

तसेच हम है राही प्यार के, दिवाना मस्ताना, भूतनाथ, गुलाब गँग, येस बॉस, स्टिल हार्ट ह्यासारख्या मोठ्या सिनेमांत मुख्य भूमिका म्हणून काम केले. ह्यापैकी बरेच चित्रपट सुपरहिट झाले व कित्येक सिनेमांना अवॉर्ड सुद्धा मिळाला.

आज जूही चावला सिनेमापासून थोडी लांबच आहे. सध्या ती एक व्यावसायिक महिला आहे आणि तिचा कोलकाता नाईट रायडर्स या संघात शाहरुख खानसह तिचा आयपीएलमध्ये अर्धा भाग आहे. तिचे उद्योगपती जय मेहताशी लग्न झाले आहे आणि आता ती दोन मुलांची आई आहे. त्यापैकी एक म्हणजेच जान्हवी मेहता जी लवकरच आपल्याला मोठ्या पडद्यावर दिसू शकते.

जान्हवी ही आईप्रमाणेच दिसायला सुंदर आहे, तिच्या अभिनयाबद्दल सध्यातरी आपण काही सांगू शकत नाही. एका मुलाखती दरम्यान जूही चावला म्हणाली होती की, तिची मुलगी चित्रपटांपेक्षा अभिनेत्री बनण्यापेक्षा एक लेखक बनू इच्छिते, परंतु या गोष्टी बर्‍याच जुन्या आहेत. काही अहवालांनुसार जान्हवी मेहता ही लवकरच सिनेमात दिसू शकते. त्यामुळे बरेच जण जान्हवी ला मोठ्या पडद्यावर बघण्यास उत्सुक आहेत.

जान्हवी आता १९ वर्षांची आहे आणि शिक्षण घेत आहे. तिला मॉडेलिंग आणि अभिनयात देखील खूप रस आहे पण त्याहूनही जास्त रस तिला लेखनात आहे. जूही चावला लवकरच तिच्या स्वत: च्या प्रॉडक्शन हाऊसमधून जान्हवीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहे असे समजते.

तसे, आयपीएलच्या लिलावात आपण जान्हवी ला पाहिलेच असेल, त्यामुळे जान्हवी चावलाला चित्रपटांपेक्षा व्यवसायात अधिक रस असल्याचे दिसते आहे. ती आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकेल की आपल्या आईच्या हे येणारी वेळच सांगेल.