DDLJ च्या ह्या गाण्यात नाचताना काजोलचा शॉर्ट स्कर्ट झाला इतका शॉर्ट.. नंतर डिलीट करावा लागला हा सीन..

बॉलिवूड नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीला स्वप्न नगरी असे देखील म्हटले जाते. अभिनय क्षेत्रात मग सिनेमा असो, वा नाटक किंवा टीव्ही सीरिअल्स रोजच हजारो लोक या चंदेरी दुनियेत सुपरस्टार बनण्याचं स्वप्न घेऊन येत असतात.. मग ते तरुण-तरुणी असोत, वयोवृद्ध कलाकार किंवा मग बाल-कलाकार..

गेल्या काही दशकात अनेक कलाकारांनी आपल्या भुमिकांनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली. आणि या भूमिका अजरामर झाल्या. आजही अनेक असे चित्रपट आहेत ज्यांना रिलीज होऊन दशकेच्या दशके होऊन गेली परंतु आजही ते प्रेक्षकांच्या हृदयात जसेच्या तसे आहेत.

यातील एक चित्रपट तर असा आहे जो प्रदर्शित होऊन चक्क 22 वर्षे झाली पण तरी तो फक्त प्रेक्षकांच्या हृदयात नसून अगदी सिनेमागृह चालकांच्या देखील मनात भरलाय. चित्रपट प्रदर्शित होऊन 22 वर्षे झाली तरी हा चित्रपट अजूनही सिनेमागृहात दाखवला जातोय. आम्ही बोलत आहोत ‘दिलवाले दूलहनिया ले जायेंगे’ बद्दल.

सुमारे 22 वर्षांपूर्वी दिग्दर्शक आदित्य चोप्राने काजोल आणि शाहरुख खान यांच्यासमवेत ‘दिलवाले दुल्हनी ले जाएंगे’ हा चित्रपट बनवला होता तेव्हा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील यशाची सर्व रेकॉर्ड मोडेल, असा विचार कोणाच्याही मनात तेव्हा आला नसेल. कारण दोघेही कलाकार तेव्हा आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या फेज मध्ये होते.

परंतु आदित्य चोप्राचा हा प्रयोग इतका सुपर डुपरहिट ठरला. हा चित्रपट इतका सुपरहिट झाला की अद्याप हा चित्रपट पडद्यावरून खाली आला नाही. या चित्रपटाने गिनीज बुकमध्ये विक्रमही केला होता. तसे, या चित्रपटाची प्रशंसा देखील झाली. या चित्रपटातील सर्वच गाणी आणि त्यांचे चित्रीकरण प्रेक्षकांच्या मनात भरली. या चित्रपटातील ‘मेरे ख्वाबों में जो आये’ गाण्याच्या एका भागामध्ये काजोलचा शॉर्ट स्कर्ट – काजोलने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट स्कर्ट परिधान करुन पावसात जोरदार डान्स केला आहे. वास्तविक, या गाण्यात काजोलच्या या शॉर्ट स्कर्टमागे एक जास्त कोणाला माहीत नसलेला किस्सा आहे.

‘मेरे ख्वाबो मे जो आये’ हे एक असे गाणे आहे जे आजही रसिकांच्या मनात आहे. अनेक कार्यक्रमात हे गाणे गायले जाते. या गाण्यात काजोलने खूपच शॉर्ट असा स्कर्ट घातला होता. वास्तविक, या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य चोप्राने हेतुपुरस्सर काजोलचा स्कर्ट छोटा ठेवला होता. सूत्रानुसार, आदित्य चोप्राला काजोलच्या स्कर्टची लांबी अजिबात आवडली नव्हती. स्कर्टच्यालांबीमुळे तो इतका नाराज होता की त्याने ताबडतोब कॉस्ट्युम डिझायनर मनीष मल्होत्राला बोलवून तो स्कर्ट छोटा करायला सांगितला.

तसेच चित्रपटाच्या या गाण्यात काजोलचा टॉवेलवर ही एक सिन होता, पण काजोल हा सीन करण्यास तयार नव्हती, ती संकोच करत होती. त्यानंतर आदित्य चोप्राने त्यांना आश्वासन दिले की ते हा सीन उत्कृष्ट पद्धतीने सादर करतील. आदित्यने समजवल्यानंतर काजोलने या दृश्यास सहमती दर्शविली. जेव्हा त्याचे शूटिंग पूर्ण झाले तेव्हा काजोलला हे गाणे पाहून खूप आनंद झाला आणि तिने आदित्यचे भरपूर कौतुकही केले. पण या गाण्यातून अनेक सीन कट देखील करण्यात आले होते.