या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने केले होते आपल्यावह मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडला किस.. किस्सा सांगताना भावुक झाली अभिनेत्री..

कंगना रणौत आपल्या वादग्रस्त आणि बिनधास्त वक्तव्यासाठी ओळखली जाते. सध्या ती महाराष्ट्र सरकार आणि बीएमसीसोबत झालेल्या वादामुळे सतत चर्चेत आहे. या वादामुळेच कंगणाला मीडिया मध्ये एक नवीन ओळख मिळाली आहे.

कंगना नेहमीच आपल्या बिनधास्त वक्तव्यामुळे सोशल मीडियात असो वा मीडियात चर्चेचा विषय ठरत असते. असच तिने तिच्या पहिल्या किसबाबत, पहिल्या रिलेशनशिपबाबत बिनधास्तपणे वक्तव्य केलं होतं. 

कंगनाने काही महिन्यांपूर्वी इंडिया टुडे कॉनक्लेवमध्ये तिच्या पहिल्या प्रेमापासून ते पहिल्या किसपर्यंत अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. यावेळी कंगना म्हणाली होती की, तिचा पहिला किस विचित्र आणि घाणेरडा होता.

कंगनाने यावेळी हेही सांगितलं की, पहिलं किस कुणाला केलं होतं. Never Say Die: Queen of Reinvention सेशन दरम्यान कंगनाने तिच्या टीनेजमधील रिलेशनशिपबाबत सांगितलं. या दरम्यान तिने तिच्या पहिल्या किसचा किस्साही सांगितला होता.

ती म्हणाली होती की, तिचा पहिला किस फारच विचित्र होता. कंगना म्हणाली होती की, तिचं तोंड पूर्णपणे फ्रीज झालं होत आणि ती हलूही शकत नव्हती.

कंगनाने तिच्या पहिल्या डेटबाबत बोलताना सांगितले की, ‘मी पहिल्यांदा १७ – १८ वर्षांची असताना रिलेशनशिपमध्ये होती. तेव्हा मी चंडीगढमध्ये होती. माझी एक मैत्रीण डेटवर गेली होती आणि नंतर तिच्या बॉयफ्रेन्डसोबत माझीही ओळखी झाली होती. तो एक क्यूट पंजाबी मुलगा होता’.

कंगनाने त्या मुलाबाबत बोलताना सांगितले की, ‘तो २८ वर्षांचा होता आणि मी तेव्हा १७-१८ वर्षांची होते. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला की, तू तर लहान मुलगी आहे. त्याच्या लक्षात आलं होतं की, या सगळ्या गोष्टींसाठी मी नवीन आहे.

माझं मन दुखावलं होतं. मला पर्सनली असं वाटत होतं की, मी फार पॅशनेट लव्हर आहे. मी तेव्हा त्याला मेसेज करत होते आणि त्याला म्हणत होते की, मला एक चान्स दे, मी मोठी होणार’.

कंगना म्हणाली होती की, ‘मी त्याला किस करू शकले नाही. तेव्हा मी किस करण्याची प्रॅक्टिस माझ्या हातावरच केली. माझा पहिला किस फार मॅजिकल नव्हता. फारच विचित्र आणि घाणेरडा अनुभव होता. माझं तोंड फ्रिज झालं होतं. मी हलूही शकत नव्हते’.

ती म्हणाली होती की, ती नवव्या वर्गात असताना तिला एक टीचर आवडत होता. इतकेच नाही तर संजय लीला भन्सालीच्या ‘हम दिल दे चुके सनम’मधील ‘चांद छुपा बादल में’ गाण्यावर दुपट्टा तोंडावर घेऊन टीचरला इमॅजिन करत होती. 

.