जेव्हा ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीने कंगना ला दिली होती डुक्कराची उपमा..

आपल्याला माहीतच आहे की कोरोना काळात प्रसार रोखण्यासाठी साठी भारतात अभूतपूर्व लॉकडाऊन घोषित करण्यात आला. याचा मोठा फटका बॉलीवूड क्षेत्राला देखील बसला होता कारण सर्वच चित्रपटांचे चित्रीकरण थांबले होत. अशा काळात सेलेब्रिटीजनी लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा पर्याय निवडला..

आपल्या सर्वांनाच कल्पना आहे सोशल मीडिया हे सध्याच्या काळात किती प्रभावशाली आहे ते. फेसबुक , ट्विटर, इन्स्टाग्राम या सारख्या सोशल मीडिया माध्यमांमुळे एखादा रस्त्यावरचा व्यक्ती रातोरात सुपरस्टार होऊ शकतो.. तसेच एखादा सुपरस्टार देखील क्षणार्धात रस्त्यावर येऊ शकतो.

अशातच या काळात एक अभिनेत्री अशी होती, जी तिच्या सोशल मीडियावरच्या वक्तव्यांनी कायमच चर्चेत राहिली. तिने राजकीय शेरेबाजी तर केलीच शिवाय नेपोटीझम सारख्या विषयांवर पण गंभीर आरोप देखील केले. आणि अनेक दिवस चर्चेत राहिली. आम्ही बोलत आहोत अभिनेत्री कंगना राणावत बद्दल.

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. राजकीय नेत्यांसह, अनेक कलाकारांनीही कंगनावर टीका केली. तर काहींनी तिला साथ ही दिली

अनेक राजकीय शेरेबाजी केल्यानंतर कंगना आता नेपोटीझम वर घसरली होती. अशात बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिनेही कंगनावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. डुक्करासोबत कधीही कुस्ती करू नये नाहीतर आपणच घाणेरडे होतो, अशा प्रकारचे ट्विट सोनम कपूरने केले होते. प्रख्यात लेखक जॉर्ज बर्नार्ड यांचे प्रसिद्ध वाक्य सोनमने ट्विट केले. मी खूप पूर्वी शिकले आहे की, डुक्करासोबत कधीच कुस्ती खेळू नये, कारण चिखलात आपणच घाण होतो शिवाय डुक्करांना चिखल आवडतो, असे ट्विट सोनमने केले होते

सोनम कपूरने केलेले हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले. तसेच हे ट्विट सोनममे कंगनासाठीच केले, हे देखील लगेच स्पष्ट झाले. त्यामुळे सोनमने कंगनाला अप्रत्यक्षपणे टोला लगावल्याने या ट्विटची चांगलीच चर्चा सुरू आहे . आधी झळकलेले आझादीचे फलक आणि मला आता मिळत असलेल्या धमक्यांमुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?, असे ट्विट कंगनाने केले आहे. त्यानंतरच या वादास सुरुवात झाली आहे.